सोलापूर जिल्ह्यात छावण्यांसाठी दोन कोटी ६३ लाखांचे अनुदान वाटप

सोलापूर जिल्ह्यात छावण्यांसाठी दोन कोटी ६३ लाखांचे अनुदान वाटप
सोलापूर जिल्ह्यात छावण्यांसाठी दोन कोटी ६३ लाखांचे अनुदान वाटप

सोलापूर  : जिल्ह्यातील चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे दोन कोटी ६३ लाख ३२ हजार ५४९ रुपयांचे अनुदानवाटप केले आहे.

एक एप्रिल ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीसाठी सांगोला, मंगळवेढा, करमाळा व बार्शी या तालुक्‍यांतील चारा छावण्यांसाठी हे अनुदान वितरित करण्यात आले. सध्या छावण्यांची संख्या वाढतेच आहे. मे महिन्यात त्यात आणखीन भर पडली आहे.

जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने चारा-पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. दोन महिन्यांपासून जनावरांसाठी छावण्या उघडण्यात येत आहेत. आतापर्यंत सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी या तालुक्‍यात छावण्या उघडण्यात आल्या आहेत. जवळपास लाखभर जनावरे त्यामध्ये आहेत. एप्रिलमध्ये छावण्या उघडलेल्या छावणीमालकांना हे अनुदान देण्यात आले. 

सांगोला तालुक्‍यातील चारा छावण्यांसाठी एक कोटी ४९ लाख ८२ हजार ३० रुपये, मंगळवेढ्यातील छावण्यांसाठी ८५ लाख ८३ हजार २९५ रुपये, करमाळ्यातील छावण्यांसाठी २४ लाख १४ हजार ७९० रुपये, बार्शीतील छावण्यांसाठी दोन लाख ६८ हजार ६५ रुपये, असे दोन कोटी ६२ लाख ४८ हजार १८० रुपयांचे अनुदान देण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com