रेशीम पार्कसाठी दोन कोटींवर निधी मंजूर ः सुभाष देशमुख

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे १० एकर क्षेत्रावर राष्ट्रीय रेशीम पार्क उभारले जाणार आहे. माळढोक पक्षी अभयारण्याच्या अडथळ्यामुळे बीबी दारफळऐवजी ते हिरजला होत आहे. त्यासाठी दोन कोटी ३० लाख रुपये मंजूर झाल्याचे सहकार, वस्त्रोद्योग व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या ३१ मार्चपूर्वी हा सगळा निधी खर्च केला जाणार असून तेथे कोषखरेदी, प्रशिक्षण, संशोधनाचे काम होईल, असेही श्री. देशमुख म्हणाले.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देऊन दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे. सुमारे ८९ लाखांपैकी ७२ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. आणखी १२ लाख अर्ज शिल्लक आहेत.

आठवडाभरात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती आल्यानंतर कर्जमाफीच्या कामकाजाला आणखी गती येईल. तसेच कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर विविध यंत्रणा आहेत. त्यांच्यात समन्वयासाठी मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला होता.

त्यानुसार तो स्थापन झाला आहे. त्याच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बॅंका आणि ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अर्जाची माहिती या सर्वांचा समन्वय ठेवला जाईल, असेही श्री. देशमुख म्हणाले.

राज्यात उडीद व मुगाची खरेदी केंद्रे या आठवड्यात सुरू होतील, उडदासाठी पाच हजार ४०० रुपये, मुगासाठी पाच हजार ५७५ रुपये हमीभाव ठरविला आहे. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावाने विक्री करू नये. या आठवड्यात उडीद व मूग खरेदी केंद्रे सुरू करणार आहोत. हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणारच, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com