agriculture news in marathi, two crores grant sanction for milk producers, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या थकीत देयकांसाठी दोन कोटींचा निधी 
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

 परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील दूध उत्पादकांकडून संकलित केलेल्या दुधाची थकित देयके अदा करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. संबंधित दूध उत्पादकांना देयके देण्यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात आला आहे. अजून तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती दुग्धशाळेच्या सूत्रांनी दिली.

 परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील दूध उत्पादकांकडून संकलित केलेल्या दुधाची थकित देयके अदा करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. संबंधित दूध उत्पादकांना देयके देण्यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात आला आहे. अजून तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती दुग्धशाळेच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारच्या (ता. ११) ‘अॅग्रोवन’मध्ये दूध उत्पादकांची साडेसात कोटींवर देयके थकित असल्याबाबतचे वृत प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने गुरुवारी (ता. १३) शासकीय दुग्धशाळेकडे दोन कोटी रुपयांचा निधी थकित दूध देयके अदा करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.प्राप्त निधी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सहकारी उत्पादक संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात आला. अजून तीन कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या दोन कोटी रुपये निधीतून ३० एप्रिलपर्यंतची थकित दूध देयके अदा करता येतील. तीन कोटी रुपये उपलब्ध झाल्यानंतर १५ मे पर्यंतची देयके अदा करता येतील. परंतु १५ जून पर्यंतची देयके थकित राहतील. त्यासाठी अजून २ ते ३ कोटी रुपये निधीची गरज आहे. आधीच दुष्काळी स्थिती त्यात दोन महिन्यांची देयके थकल्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या होत्या. चारा, पेंड खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची कमी दराने विक्री केली. त्यामुळे दूध संकलनात घट झाली. थकित देयकांसाठी निधी प्राप्त झाल्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळाला. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे दीडशे दूध उत्पादक सहकारी संस्थांचे पाच महिन्यांचे कमिशन, थकित कमिशन तसेच मे आणि जून महिन्यातील थकित दूध देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...