agriculture news in Marathi two crores turnover from direct vegetable sell Maharashtra | Page 2 ||| Agrowon

भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी विकला दोन कोटीचा शेतमाल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात राज्यभरात फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल केली केली आहे.

कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात राज्यभरात फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल केली केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून व संघाच्या शहरातील कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजीपाला व फळांची विक्री संघाने सुरू ठेवली आहे. ग्राहक पंचायत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (ग्रामविकास विभाग) यांच्या सहकार्याने ‘इर्जिक’ या नावाने हा उपक्रम सुरू आहे. 

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २९ तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघाच्या मार्फत थेट भाजीपाला विकला आहे. या जिल्ह्यातील १६४ शेतकरी गटांच्या मार्फत भाजीपाला संकलीत करून तो शहरी भागात विकण्यात आला. या उपक्रमाचा या जिल्ह्यातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. दीड लाखाहून अधिक ग्राहकांनी व्यापाऱ्यापेक्षा कमी दरात या शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत आहेत. 

जनता कर्प्यू जाहीर झाल्यानंतर लगेच भारतीय किसान संघाने प्रांत कार्यकारिणीची बैठक घेतली व अगामी काळात शेतीमध्ये तात्काळ व दिर्घकाळ कोणत्या समस्या येतील याचा विचार करून सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सर्वेक्षणाच्या सुचना देण्यात आल्या. नाशवंत भाजीपाला, फळे यांचे मार्केटींग करणे हे अत्यंत तातडीचे होते हे लक्षात आले.

विक्रीसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर येथील हौसिंग सोसायटी, कॉलिनीज येथील ग्राहकांचे सर्वेक्षण केले. वॉट्सॲप ग्रुप बनवले, गुगल पेजद्वारे त्यांच्या प्रत्येक आठवड्याची भाजीपाला फळे यांची मागणी नोंदवून घेतली. या साठी शहरातील कार्यकर्त्यांनी काम केले. 

आठ जिल्ह्यातील २९ तालुक्यांत १६४ गावात शेतकऱ्यांचे गट स्थापन करून हे काम ताबडतोब सुरु केले. सुमारे पाचशे शेतकरी या गटांच्या माध्यमातून शहरी भागातील ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरवत आहेत. 

भाजीपाला, फले विक्री 
सहभागी जिल्हे - ८ 
सहभागी तालुके - २९ 
सहभागी गावे - १७४ 
शहरातील सोसायटी -१४९ 
कार्यकर्ते ५०० 
शेतकरी - ५०० हुन अधिक 
ग्राहक - १७०००० 
शेतमाल विक्री - ५०० टनाहून अधिक 
उलाढाल - २ कोटी 

भाजीपाला, फळांचे लॉकडाउन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला पुर्वीपेक्षा जादाभाव तर शहरी ग्राहकांना पुर्वीपेक्षा कमी भावात शेतमाल मिळत आहे. ग्राहक व शेतकरी कायमस्वरूपी ही योजना चालवण्यासाठी सिध्द झाले आहेत. ही संधी भारतीय किसान संघाने कोरोनाच्या संकटात शोधली आहे. 
- मदन देशपांडे, भारतीय किसान संघ महामंत्री 


इतर अॅग्रो विशेष
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...