दुष्काळी भागातून जमा झाली दोन कोटींची पाणीपट्टी

म्हैसाळ योजनेतून आतापर्यंत तीन टीएमसी पाणी उचलले असून, दोन कोटी रुपये पाणीपट्टी जमा झालेली आहे. योजनेच्या सर्व टप्प्यात ७५ पंप सुरू आहेत.
दुष्काळी भागातून जमा झाली दोन कोटींची पाणीपट्टी Two crores of water was collected from the drought stricken areas
दुष्काळी भागातून जमा झाली दोन कोटींची पाणीपट्टी Two crores of water was collected from the drought stricken areas

सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीसाठी यंदा सिंचन योजना शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरत आहेत. म्हैसाळ, टेंभू योजनेतील पाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हैसाळ योजनेतून आतापर्यंत तीन टीएमसी पाणी उचलले असून, दोन कोटी रुपये पाणीपट्टी जमा झालेली आहे. योजनेच्या सर्व टप्प्यात ७५ पंप सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पारे, हंगिरगे, गावडेवाडी परिसरात एप्रिलमध्ये पाणी सोडले होते. 

म्हैसाळ योजना सुरू केल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच पाण्याच्या मागणीअभावी योजना बंद करावी लागेल, अशी भीती पाटबंधारे प्रशासनाला वाटत होती. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यानंतर योजना नियमित नव्हे तर चांगली मागणी आणि रोखीने पैसे भरून शेतकरी पाणी घेत आहेत. 

मिरज पूर्व, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांतून मागणी वाढलेली आहे. सर्वच तालुक्यात सध्या मागणीप्रमाणे पाणी दिले जात आहे. यंदा पाणीपट्टी वसुलीलाही शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सुमारे दोन कोटींहून अधिक पाणीपट्टी जमा झाली आहे. याच योजनेसाठी मार्चअखेर ५० लाख एवढीच पाणीपट्टी जमा झालेली होती. त्यानंतर गेल्या महिन्याभरात दीड कोटी रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांनी जमा केली आहे. 

सध्या विविध टप्प्यांवर ७५ पंप सुरू आहेत. जलसंपदाच्या नियमानुसार ८१:१९ प्रमाणात पाण्याचे पैसे भरावे लागतात. यातील १९ टक्के रक्कमही शेतकरी भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र सुरुवातीस होते. शेतकऱ्यांना नियमित पाणीपट्टी भरण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया म्हैसाळ योजनेला यंदा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ३१ मार्चअखेर ५० लाख तर एप्रिलअखेर दोन कोटींहून अधिक पाणीपट्टी रक्कम जमा झाली आहेत. आतापर्यंत तीन टीएमसी पाण्याची उचल झालेली आहे. मागणी असेपर्यंत योजना पूर्ण क्षमतेने चालवली जाईल.  - सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com