जगभरातील कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी उरली दोन दिवस

शेतकऱ्यांना जगभरातील कृषी तंत्रज्ञानाचा धांडोळा पाहण्याची संधी दोन दिवस उरली असून बारामती-शारदानगर येथील कृषिक २०२१-कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा समारोप रविवारी (ता. २४) सायंकाळी होणार आहे.
Two days left to see agricultural technology from around the world
Two days left to see agricultural technology from around the world

माळेगाव, जि. पुणे ः शेतकऱ्यांना जगभरातील कृषी तंत्रज्ञानाचा धांडोळा पाहण्याची संधी दोन दिवस उरली असून बारामती-शारदानगर येथील कृषिक २०२१-कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा समारोप रविवारी (ता. २४) सायंकाळी होणार आहे. त्यामुळे दूरदृष्टीने शेती करण्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी उर्वरित दोन दिवसांत विशेषतः बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर आदी भागातील अधिकाधिक स्थानिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

यंदा मोफत प्रवेश असल्याने मागील पाच दिवसांत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकऱ्यांनी वरील तंत्रज्ञान सप्ताहाला भेट देऊन ज्ञानाची शिदोरी घेऊन गेल्याची नोंद आहे. त्यामध्ये आदर्श शेतीचे माॅडेल पाहून महिलांसह हजारो शेतकऱ्यांनी विविध स्टाॅलवरून माहिती घेतली. येथून परतताना आपल्या शेतीमध्ये नवीन काहीतरी करण्याच्या हुरूप त्यांच्या चेहऱ्यावर होता.

दरम्यान, गेली पाच वर्षांपासून कृषी प्रात्याक्षिकांवर आधारित ‘कृषिक’ प्रदर्शन शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात भरविले जाते. जगभरातील शेती तंत्रज्ञानाचा धांडोळा या प्रदर्शनात घेतला जातो. यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत हजारो शेतकऱ्यांना कृषी सप्ताहाच्या निमित्ताने कृषीक्रांतीची उज्वल दिशा सापडल्याचे सांगण्यात आले. हे प्रदर्शन म्हणजे कृषिनिष्ठावंतांचे माहेरघरच आहे, असे शिवाजी घोरपडे (शिराळा, जि. सांगली) यांनी सांगितले.

आजच्या शेतीला गरज असलेले नवे व जुने जगभरातील शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना घेता आली. माहिती, ज्ञान व तंत्रज्ञानाचा संगम खरेतर येथे पहावयास मिळाला. - श्रीकांत काळे, जि. बीड

माझ्या मालकीची चाळीस एकर जमीन आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे आम्हाला शेती करणे कठीण जाते. कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येते, याचे प्रात्याक्षिकच येथे पहावयास मिळाले. - विलास मोहिती, माजलगाव, जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com