गारपीटग्रस्त भागाचे दोन दिवसांत सर्व्हेक्षण ः मंत्री ठाकूर

Two days survey of hailstorm: Minister Thakur
Two days survey of hailstorm: Minister Thakur

अमरावती ः जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पिकांचे नुकसान झाले होते. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करीत सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. 

मोर्शी तालुक्‍यातील नेरपिंगळाई, वाघोली आदी गावांना भेट देत शेतीची पाहणी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांची या वेळी उपस्थिती होती.

ॲड. ठाकूर यांनी या दौऱ्यात नेरपिंगळाई येथे लक्ष्मण महादू झोडगे, प्रवीण कोहळे, अतुल चांडक, वाघोली येथील ओंकार चांगोले या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जात पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गारपिटीने बाधित झालेल्या गावांची आणि पिकांच्या क्षेत्राची त्यांनी विजय चवाळे यांच्याकडून माहिती घेतली. जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत स्वतंत्र नुकसान सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मंत्री ठाकूर यांनी कृषी विभागाला दिले. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. त्यानुसार आवश्‍यक मदतीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी या वेळी सांगितले. सार्सी, नेर पिंगळाई, राजुरवाडी आदी ग्रामस्थांनी ॲड. ठाकूर यांचे यासाठी आभार मानले.

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीला पाणीपुरवठा, शेतमालाला हमीभाव, पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने भरपाई या बाबी आवश्‍यक आहेत. त्यासाठी शासन कटीबध्द असून सिंचन सुविधा वाढीवर पहिल्या टप्प्यात भर दिला जाणार आहे. - ॲड. यशोमती ठाकूर,  महिला व बालविकासमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com