'चिकनमुळे कोरोना' अशी अफवा पसरवणारे दोघे गजाआड

'चिकनमुळे कोरोना' अशी अफवा पसरवणारे दोघे गजाआड
'चिकनमुळे कोरोना' अशी अफवा पसरवणारे दोघे गजाआड

पुणे : चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो, अशी व्हिडिओद्वारे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या सायबर पोलिसांनी आवळल्या. एकाला आंध्र प्रदेशातून, तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. महंमद अब्दुल सत्तार (आंध्र प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलगा आहे. सायबर पोलिसांकडून यू-ट्यूबद्वारे कोरोना विषाणूबाबत अफवा पसरविणाऱ्यांची माहिती घेण्यात आली. एक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचे आढळले. त्यानंतर सायबर पोलिस उत्तर प्रदेशात पोचले. तपासाअंती संबंधित मोबाईल एका महिलेचा असून, एक अल्पवयीन मुलगा तो वापरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  आंध्र प्रदेशमधील सत्तार यानेही याच पद्धतीने व्हिडिओ बनवून प्रसारित केला होता. दोघांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलिस कर्मचारी अजित कऱ्हे, हर्षल दुसाने, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com