Agriculture news in marathi Two farmers go on hunger strike in Pune for crop insurance in extreme cold | Agrowon

कडाक्याच्या थंडीत पीकविम्यासाठी दोन शेतकऱ्यांचे पुण्यात उपोषण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 डिसेंबर 2020

कृषी आयुक्तालयासमोर कडाक्याच्या थंडीत मराठवाड्यातील दोन शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीने संगनमत करून विमा भरपाई मिळू न दिल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. 

पुणे : कृषी आयुक्तालयासमोर कडाक्याच्या थंडीत मराठवाड्यातील दोन शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीने संगनमत करून विमा भरपाई मिळू न दिल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी सोमवारपासून (ता. २१) उपोषण सुरू केले आहे.

जालन्याच्या घनसांगवी भागातील भोगगाव येथील सुधीर रामनाथ मुळे व पुंजाराम दादाराव जाधव, अशी उपोषण करणाऱ्यांची नावे आहेत. २४ ऑक्टोबर २०१९ मध्ये गावात झालेल्या तुफान पावसामुळे गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीचे पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले होते. दुसऱ्याच दिवशी ७२ तासांच्या आत या शेतकऱ्यांनी नुकसानीची लेखी खबर (इंटिमेशन) दिली होती.

“आम्ही कळवून देखील भरपाई टाळण्यासाठी विमा कंपनी व कृषी खात्याने संगनमत करून पिकाचा पंचनामा करण्याचे टाळले. यामुळे आम्ही २१ ते २४ डिसेंबर, असे चार दिवस जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर पंचनामा करण्याचे आश्वासन दिल होते,” अशी माहिती शेतकरी मुळे यांनी दिली.

उपोषण सोडताना आमच्या शेताचा पंचनामा तीन महिन्यानंतर कसा करणार, असा सवाल आम्ही उपस्थित केला होता. त्यावर, काळजी करू नका आपण अवशेषाचा पंचनामा करू, असा तोडगा अधिकाऱ्यांनी काढला. मात्र, २६ ऑक्टोबरला कृषी कर्मचारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधीने गावात जावून कोऱ्या अहवालावर स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

 “आम्हाला पंचनाम्याची प्रत द्या, अशी मागणी करूनही कृषी खाते देत नव्हते. त्यासाठी मी आठ वेळा माझ्या गावाहून ९० किलोमीटर एसएओ ऑफिसला प्रवास केला. त्यानंतर मला प्रत मिळाली असता, शेतात कापूस नसल्याची नोंद त्यात केली होती. आम्ही थेट विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण कृषी खात्याला कळविले. मात्र, दखल घेतली गेली नाही,” अशी कैफियत मुळे यांनी मांडली.

शेतकऱ्यांची मागणीच चुकीची
“पीक विमा योजनेतील नियमानुसार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. वैयक्तिकपणे भरपाईची मागणी करता येत नाही. नियमाविरूद्ध मागणी असल्यामुळेच या शेतकऱ्यांची दखल घेतली गेलेली नाही,” अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...