राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेच

धरणक्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने राधाननगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी (ता. १२) खुलेच होते. या दरवाजातून ४२५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक ८५ मिलिमीटर पाऊस झाला .
The two gates of Radhanagari Dam are open
The two gates of Radhanagari Dam are open

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरणक्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने राधाननगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी (ता. १२) खुलेच होते. या दरवाजातून ४२५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. बुधवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक ८५ मिलिमीटर पाऊस झाला .

जिल्ह्यातील चोवीस बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. यामध्ये पंचगंगा, कुंभी, वारणा दुधगंगा, आदी नद्यांवरील बंधाऱ्यांचा समावेश आहे. गगनबावडा, आजरा, चंदगड तालुके वगळता अन्य तालुक्‍यांत थांबून थांबून पावसाच्या सरी असेच पावसाचे स्वरूप राहिले.

हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात मुख्यत्वे करून ढगाळ हवामान राहिले आहे. पंचगंगा नदीचे पाणी झपाट्याने कमी होत आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी नऊ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणीपातळी ३४ फूट १० इंच इतकी नोंदविली गेली. इशारा पातळीपासून पाणी सुमारे ४ फुटांनी खाली गेले आहे. राधानगरी धरणांतून विसर्ग सुरू असला तरी धरणाचे पाणी वगळता अन्य गावात जोरदार पाऊस नसल्याने स्थानिक ओढ्या नाल्याचे पाणी नदीत येण्याचे प्रमाण कमी असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पावसाचा जोर वाढल्यास तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे.

चित्री प्रकल्पातून वीज निर्मितीस सुरुवात आजरा येथील चित्री प्रकल्पातून पूर व धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने मंगळवारी (ता. ११) दुपारी पाणी सोडले. विद्युत गृहातून १८० क्‍युसेकने विसर्ग होत असून वीजनिर्मितीला सुरुवात झाली आहे. तासाला दोन मेगा युनिट विजेची निर्मिती हात आहे. प्रकल्पात बुधवार अखेर ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता व्यक्त होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पूर नियंत्रणासाठी धरणातील पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे आजऱ्याचे शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी सांगितले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com