देशात दोनशे कृषी हवामान सल्ला केंद्र; महाराष्ट्रात पाच कार्यान्वित

देशात दोनशे कृषी हवामान सल्ला केंद्र; महाराष्ट्रात पाच कार्यान्वित
देशात दोनशे कृषी हवामान सल्ला केंद्र; महाराष्ट्रात पाच कार्यान्वित

पुणे : शेतकऱ्यांनी कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे, पिकांवर कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करायची. पिके घेण्यास कोणते हवामान अनुकूल आहे. सध्याचे हवामान कसे आहे. यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी, याकरिता देशभरात आणखी दोनशे जिल्हानिहाय कृषी हवामान सल्ला केंद्र सुरू (डिस्ट्रिक्ट अॅग्रोमेट युनिट, दामू) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती हवामान खात्याचे कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृपान घोष यांनी दिली.  हवामान विभागाच्यावतीने ‘बदलत्या हवामानातील नवीन सुधारणा’ या विषयावर चर्चासत्र मंगळवारी (ता. ४) आयोजित केले होते. या वेळी डॉ. घोष यांनी ही माहिती दिली. या वेळी पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै. शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव, शास्त्रज्ञ डॉ. ए. कश्यपी, शास्त्रज्ञ डॉ. पी. गुहाटाकुर्ता, शास्त्रज्ञ डॉ. एस. एन दुत्ता, शास्त्रज्ञ यू. आर. जोशी आदी उपस्थित होते. डॉ. घोष म्हणाले, ‘‘सध्या देशभरात १३० डिस्ट्रिक्ट अॅग्रोमेट युनिट (दामू) यापूर्वीच सुरू झाली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात वाशीम, भंडारा, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली या पाच ठिकाणी डिस्ट्रिक्ट अॅग्रोमेट युनिट कार्यरत आहेत. आणखीन नऊ जिल्ह्यांमध्ये ही युनिट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक (इगतपुरी), परभणी, राहुरी (नगर), अकोला या जिल्ह्याचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हवामानासंबधीची माहिती मिळावी. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट अॅग्रोमेट युनिट (दामू) सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र टप्प्याटप्प्याने ही युनिट कार्यान्वित होत आहेत.’’   ‘‘सध्या किसान पोर्टल आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना दररोजचे हवामान आणि पिकांस अनुकूल की प्रतिकूल परिस्थिती आहे. यासंबधीची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी पुढील पाच दिवसांच्या हवामान अंदाजही देण्यात येतो. महाराष्ट्रात आजमितीला जवळपास ५३ लाख शेतकरी या एसएमएस सुविधेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मराठी भाषेत दररोजच्या हवामानाचा अंदाज देण्यात येतो. यामध्ये पुढील पाच दिवसांतील हवामानाची माहिती, कोणते पीक कोणत्या हंगामात घेणे योग्य ठरेल. यासंबंधीचा सल्ला देण्यात येतो.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com