सांगली जिल्ह्यात टॅंकरचे द्विशतक

सांगली जिल्ह्यात टॅंकरचे द्विशतक
सांगली जिल्ह्यात टॅंकरचे द्विशतक

सांगली : जून महिना सुरू झाल्याने जिल्ह्यात नागरिक, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पाणीटंचाईती स्थिती अधिकच भीषण होत आहे. सध्या २०० गावे आणि एक हजार २५१ वाड्या, वस्त्यांमधील चार लाख एक हजार २७९ लोकांना १९९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दिवसेंदिवस या तालुक्यातील गावात टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. जून महिन्याचा पहिला आठवडा संपला, तरी पावसाने सुरवात केली नाही. यामुळे पाणीटंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून दुष्काळी तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावे आणि टँकरेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाई सुरू झाली. या महिन्यात ४१ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये जानेवारीपासून दुपटीने वाढ झाली. मार्च, एप्रिलमध्ये या संख्येत मोठी वाढ झाली. 

जत तालुक्यातील ९४ गावे आणि ७७६ वाड्या, आटपाडी २५ गावे आणि २१७ वाड्या, कवठेमहांकाळ २६ आणि १३६ वाड्या, खानापूर १६ गावे आणि दोन वाड्या, तासगाव २२९ गावे १५१ आणि  मिरज १० गावे २९ वाड्या, अशा २०० गावे आणि एक हजार २५१ वाड्या, वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

जत तालुक्याला सर्वाधिक झळा

चारा आणि पाण्याची टंचाई जत तालुक्यात सर्वाधिक आहे. सध्या तालुक्यातील १२३ गावांपैकी तब्बल ९४ गावे आणि ७१६ वाड्या, वस्त्यांमधील सुमारे सव्वादोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत पूर्वभागातील बहुतांशी गावांचा समावेश आहे. पश्चिम भागात म्हैसाळ योजेनेचे पाणी आले आहे. पूर्वभाग मात्र कोरडाच आहे. यामुळेच सध्या या भागातील सर्व गावात पाणीटंचाई गंभीर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com