नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत २०२ उमेदवारांचे अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यामधील बारा मतदारसंघातून सुमारे २०२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात अपक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मतविभागणी टाळण्यासाठी अपक्षांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्यासाठी अधिकृत पक्षांच्या उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.   

विधानसभा निवडणुकीसाठी अकोले मतदारसंघातून डॉ. किरण लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), वैभव पिचड (भाजप), दीपक पथवे (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह चार अपक्षांनी अर्ज भरले आहेत. संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (काँग्रेस), बापू रणधीर, साहेबराव नवले (शिवसेना), शरद गोर्डे (मनसे), सूर्यभान बाबूराव गोरे (बसपा), बापूसाहेब ताजणे (वंचित बहुजन आघाडी), संपत कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी) यांच्यासह चार अपक्षांनी अर्ज भरले आहेत. शिर्डी मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) सुरेश जगन्नाथ थोरात (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शिमोन जगताप (बसपा) यांच्यासह चार अपक्ष अर्ज आले आहेत.

कोपरगाव मतदारसंघात  स्नेहलता कोल्हे (भाजप), राजेश परजणे (अपक्ष), अशोक गायकवाड (बहुजन वंचित आघाडी), शिवाजी कवडे (बळीराजा पार्टी), शीतल कोल्हे (हिंदुस्थान जनता पार्टी), आशुतोष काळे (राष्ट्रवादी), माधव त्रिभुवन (बसपा) यांसह पंधरा अपक्ष अर्ज दाखल झाले आहेत. श्रीरामपूर मतदारसंघात सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. चेतन लोखंडे (अपक्ष-शिवसेना), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), डॉ. सुधीर क्षीरसागर (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह तब्बल २८ अपक्ष अर्ज दाखल आहेत. नेवासा मतदारसंघात माजी आमदार शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), आमदार बाळासाहेब मुरकुटे (भाजप), शशिकांत मतकर (वंचित बहुजन पार्टी), कारभारी धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), अशोकराव कोळेकर (वंचित बहुजन पार्टी), विश्वास वैरागर (बसपा), सचिन गव्हाणे (मनसे) यांच्यासह सोळा अपक्षांचे अर्ज दाखल आहेत.

शेवगाव मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे (भाजप) जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे (अपक्ष आणि भाजप), किसन चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी), कमरुद्दिन दगडु शेख (एमआयएम) यांच्यासह तेरा अपक्षांचे अर्ज दाखल आहेत. राहुरी मतदारसंघातून ‍आमदार शिवाजी कर्डीले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) यांच्यासह आठ अपक्षांचे अर्ज दाखल आहेत. 

पारनेर मतदारसंघात नीलेश लंके (राष्ट्रवादी), विजय औटी (शिवसेना), दगडू शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद खामकर (जनता पार्टी), जितेंद्र साठे (बसपा) सुजीत झावरे (अपक्ष) यांच्यासह चार अपक्षांचे अर्ज दाखल आहेत. नगर मतदारसंघात किरण काळे (वंचित बहुजन आघाडी), संतोष वाकळे (मनसे), अनिल राठोड (शिवसेना), संग्राम जगताप (राष्ट्रवादी) बहिरुनाथ वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), श्रीपाद छिंदम (बसपा) व बारा अपक्षांनी अर्ज दाखल केले. श्रीगोंदा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते (भाजप), सुनील ओहोळ (बसपा), घनशाम शेलार (राष्ट्रवादी) टिळक घोस (संभाजी ब्रिगेड),‍ मच्छिंद्र सुपेकर (वंचित बहुजन आघाडी), अण्णासाहेब शेलार (अपक्ष), विनोदसिंग परदेशी (प्रहार जनशक्ती पक्ष) तात्याराम घोडके (बसपा), जठार अप्पा (शेकाप) यांच्यासह दहा अपक्षांनी अर्ज दाखल केले.

कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार (राष्ट्रवादी), पालकमंत्री राम शिंदे (भाजप), आप्पा पालवे (मनसे) शंकर भैलुमे (बसपा), सोमनाथ शिंदे (जनहित लोकशाही पार्टी) यांच्यासह बारा अपक्षांनी अर्ज दाखल केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com