agriculture news in marathi two indian institution to research on corona DNA | Agrowon

कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न; भारतातील दोन संस्थांचा पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय आराखडा (जीनोम सिक्वेन्सिंग) तयार करण्याचे काम भारतातील दोन प्रमुख संस्थांतर्फे संशोधन सुरू करण्यात आले आहे. ‘

नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय आराखडा (जीनोम सिक्वेन्सिंग) तयार करण्याचे काम भारतातील दोन प्रमुख संस्थांतर्फे संशोधन सुरू करण्यात आले आहे. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्‍युलर बायॉलॉजी'(सीसीएमबी -हैदराबाद) आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्‍स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी'(आयजीआयबी - नवी दिल्ली) अशी संस्थांची नावे आहेत.

या विषाणूच्या संपूर्ण गुणतत्त्व रचनेचा तक्ता तयार करण्याचे काम या संस्थांनी सुरू केले आहे. हा विषाणू कसा उत्क्रांत किंवा विकसित झाला, तो किती चैतन्यशील आहे आणि किती वेगाने त्याची वाढ होते यावर हे संशोधन प्रामुख्याने केंद्रित राहणार आहे. यावरूनच त्याच्या भविष्यातील विकसनाबाबतचे आडाखे मांडणे शक्‍य होईल असे या ‘सीसीएमबी' संस्थेचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले.

एखाद्या जिवाची वैशिष्ट्यपूर्ण रचना समजून घेण्यासाठी जनुकीय आराखडा किंवा गुणतत्त्व रचनेची पद्धती अवलंबिली जाते व यातून संबंधित जिवाच्या ‘डीएनए'ची मालिकाही निश्‍चित केली जाऊ शकते. यासाठी ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्याकडील काही नमुने घेण्यात आले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी मोठ्या प्रमाणात नमुन्यांची आवश्‍यकता भासते. जर मोजक्‍या नमुन्यांचा उपयोग केल्यास निश्‍चित निष्कर्ष किंवा अनुमान लावणे अवघड होते किंवा त्यात त्रुटी राहतात व त्यामुळेच नमुन्यांची संख्या मोठी लागते आणि विविध रुग्णांकडून ते गोळा करावे लागतात. शेकडो नमुन्यांच्या तपासणीनंतर त्यातील समान धागा शोधणे शक्‍य होते आणि त्यानंतरच त्याच्या प्रतिकाराबाबतच्या उपायांवर विचार करता येतो.

पुढील तीन ते चार आठवड्यात किमान दोनशे ते तीनशे नमुने संशोधकांकडे जमा होणे अपेक्षित आहे. आताही संशोधनाचे काम चालूच आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध रुग्ण तसेच भारतासारख्या विशाल देशाची भौगोलिकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या राज्यातूनही नमुने गोळा करण्यात येत आहेत. त्या आधारेच व्यापक चित्र स्पष्ट होणे शक्‍य आहे. यातूनच या विषाणूची कमजोरी तसेच मजबुती या दोन्हीचा अंदाज लावणे शक्‍य होईल. त्या आधारेच या विषाणूला नष्ट करण्याची रणनीती तयार करता येणार आहे.

विषाणूवर ‘द्रवा'ची मात्रा
मुंबई आयआयटीच्या बायोसायन्स आणि बायइंजिनिअरिंग विभागातर्फे कोरोना विषाणूला निष्क्रिय करणारा एक द्रव (जेल) तयार करण्यात येत असून केंद्र सरकारच्या सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्डातर्फे त्या प्रकल्पाला मदत दिली जात आहे. ही ‘जेल' किंवा द्रवपदार्थ नाकाला लावण्याचा आहे. कोरोना विषाणूचा प्रवेश मुख्यतः नाक व तोंडाद्वारे होत असतो. या जेलमुळे हा विषाणू निष्क्रिय होणे अपेक्षित आहे. येत्या नऊ महिन्यात ही ‘जेल' उपलब्ध होईल असे सांगण्यात येते. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...