बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

बुलडाणा ः ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या तांदूळवाडी शिवारात रविवारी (ता. ७) बिबट्याने हल्ला केल्याने दोघे जखमी झाले. मंगेश भाऊराव राठोड व उमेश लालसिंग राठोड अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खामगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दोघांची आमदार आकाश फुंडकर यांनी भेट घेत विचारपूस केली. ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या तांदूळवाडी शिवारात मंगेश व उमेश (रा. भालेगाव) हे काम करीत होते. त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आले. आमदार फुंडकर यांनी जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी माळी यांच्याशी चर्चा करून बिबट्याच्या वारंवार होणा-या घटना तातडीने थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सदर बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे असेही सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com