‘माफसू’ला मिळाले `केव्हीके`

MAFSU
MAFSU

नागपूर ः पशू व मत्स्य विज्ञानाचा प्रसार प्रचार होण्याकामी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला (माफसू) राज्यात दोन कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) मंजूर करण्यात आले आहेत. या माध्यमातून विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.  ‘माफसू’अंतर्गंत विस्तार विभाग असला तरी पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी या कामाला गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित गती मिळाली नाही. परिणामी, विद्यापीठाव्दारे विकसित तंत्रज्ञानाचा प्रचारही होऊ शकला नाही. कृषी विस्ताराकरिता `केव्हीके` मिळावे, अशी मागणी ‘माफसू’ प्रशासनाची होती. तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक मोहन भागवत यांना मानद डॉक्‍टरेट पदवी देत त्यांना ‘माफसू’कडून गौरविण्यात आले. या वेळी देखील ‘माफसू’ला केव्हीके मिळावे, अशी मागणी करण्यात आली. विविध व्यासपीठावर या संदर्भाने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.  डॉ. मिश्रा यांच्या नंतर विद्यमान कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर यांनी देखील केव्हीकेसाठी प्रयत्न चालविले होते. हे प्रयत्न सार्थकी लागत सांगली आणि नागपूर जिल्ह्यांसाठी `केव्हीके` मंजूर करण्यात आले आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेने मान्यता दिल्यानंतर गुरुवारी (ता. ९) ‘माफसू’च्या कार्यकारी परिषदेसमोर हा विषय ठेवण्यात आला. कार्यकारी परिषदेने देखील याला मान्यता दिल्यानंतर `केव्हीके`चे कामकाज सुरू झाले आहे. शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन पहिल्या टप्प्यात `केव्हीके`च्या माध्यमातून केले जात असून लवकरच पदभरती होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  ग्रामपंचायतीने दिले हॉल तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) तसेच दुधबर्डी (कळमेश्‍वर, जि. नागपूर) या दोन ठिकाणी `केव्हीके`ला मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून जागेची उपलब्धता करून देण्यात आली असली तरी त्या ठिकाणी इमारत नाही. त्यामुळे माफसू प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून हॉलची उपलब्धता तात्पुरती करीत कामकाज सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com