अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण 

राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने आणि गेल्या वर्षी कोरोना संक्रमणासह निसर्गाने घातलेल्या घाल्याने घायाकुतीस आलेला शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारात शरण गेला आहे.
farmer
farmer

अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने आणि गेल्या वर्षी कोरोना संक्रमणासह निसर्गाने घातलेल्या घाल्याने घायाकुतीस आलेला शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारात शरण गेला आहे. अमरावती विभागातील दोन लाख ४७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी सावकारांकडे जमिनी गहाण ठेवल्या आहेत. 

युती सरकारच्या काळात कर्जमाफी झाली, तेव्हापासून कर्जवाटपाची यंत्रणा विस्कळित झाली आहे. गेल्यावर्षी कर्जमाफी व कोरोना संक्रमण, अशा दोन्ही पार्श्वभूमीवर कर्जवाटप ६३ टक्क्यांवर गेले होते. यंदाच्या हंगामात ते ५० टक्क्यांचाही पल्ला गाठू शकलेले नाही. जिल्हा बँकांनी कर्जवाटपात कसूर न केल्याने शेतकऱ्यांना पेरणी व मशागतीला पैसा उपलब्ध झाला. राष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी गेल्यावर्षीचा कर्जमाफीचा पैसा पदरात पाडून घेतल्यानंतर यंदा मात्र वाटप करताना हात आखडता घेतला. पन्नास टक्क्यांवर या बँकांच्या कर्जवाटपाची मर्यादा गेलेली नाही. आता पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना खते व फवारणीसाठी पैशांची निकड आहे. 

पश्चिम विदर्भात ९८८ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांनी शेतीविषयक कर्जाच्या नावाखाली एक लाख ९२६ शेतकऱ्यांना ९७ कोटी ४१ लाख रुपये, तर बिगरशेती कर्जासाठी १ लाख ४६ हजार ९५१ शेतकऱ्यांना १६७ कोटी ४९ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. एकूण दोन लाख ४७ हजार ८७७ शेतकऱ्यांना २६४ कोटी ९० लाख रुपये अधिकृत सावकारांकडून कर्ज देण्यात आले आहे. ही शासकीय नोंद असली तरी अनधिकृत सावकारीचा व्यवसायही मोठा आहे. त्यांच्याकडूनही अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्याची कुठेच नोंद नाही. अधिकृत सावकारांकडून शेती तारणावर नऊ टक्के वार्षिक, बिगरशेती तारणासाठी १५ टक्के, बिगरतारणासाठी १२ टक्के व बिगर शेती विनातारण कर्जासाठी १८ टक्के व्याज आकारले जाते.  बिगरशेतीसाठीच अधिक कर्ज  विभागात शेतीविषयक कर्ज घेणाऱ्यांची संख्या बिगरशेतीसाठी (व्यापारी) कर्ज घेणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. १४६ कोटी ९५ लाख ९५१ शेतकऱ्यांनी १६७ कोटी ४९ लाख रुपये कर्ज घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण अकोला जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ७८७ शेतकऱ्यांनी १४४ कोटी ३८ लाख रुपये, त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ९९ शेतकऱ्यांनी १४ कोटी ५६ लाख, यवतमाळमध्ये तीन हजार ९०७ शेतकऱ्यांनी ४ कोटी ७९ हजार व वाशीम जिल्ह्यात दोन हजार ४ शेतकऱ्यांनी २ कोटी ९९ लाख रुपये कर्ज घेतले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com