agriculture news in Marathi two lac farmers land Mortgage to money lender Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने आणि गेल्या वर्षी कोरोना संक्रमणासह निसर्गाने घातलेल्या घाल्याने घायाकुतीस आलेला शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारात शरण गेला आहे.

अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने आणि गेल्या वर्षी कोरोना संक्रमणासह निसर्गाने घातलेल्या घाल्याने घायाकुतीस आलेला शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारात शरण गेला आहे. अमरावती विभागातील दोन लाख ४७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी सावकारांकडे जमिनी गहाण ठेवल्या आहेत. 

युती सरकारच्या काळात कर्जमाफी झाली, तेव्हापासून कर्जवाटपाची यंत्रणा विस्कळित झाली आहे. गेल्यावर्षी कर्जमाफी व कोरोना संक्रमण, अशा दोन्ही पार्श्वभूमीवर कर्जवाटप ६३ टक्क्यांवर गेले होते. यंदाच्या हंगामात ते ५० टक्क्यांचाही पल्ला गाठू शकलेले नाही. जिल्हा बँकांनी कर्जवाटपात कसूर न केल्याने शेतकऱ्यांना पेरणी व मशागतीला पैसा उपलब्ध झाला. राष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी गेल्यावर्षीचा कर्जमाफीचा पैसा पदरात पाडून घेतल्यानंतर यंदा मात्र वाटप करताना हात आखडता घेतला. पन्नास टक्क्यांवर या बँकांच्या कर्जवाटपाची मर्यादा गेलेली नाही. आता पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना खते व फवारणीसाठी पैशांची निकड आहे. 

पश्चिम विदर्भात ९८८ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांनी शेतीविषयक कर्जाच्या नावाखाली एक लाख ९२६ शेतकऱ्यांना ९७ कोटी ४१ लाख रुपये, तर बिगरशेती कर्जासाठी १ लाख ४६ हजार ९५१ शेतकऱ्यांना १६७ कोटी ४९ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. एकूण दोन लाख ४७ हजार ८७७ शेतकऱ्यांना २६४ कोटी ९० लाख रुपये अधिकृत सावकारांकडून कर्ज देण्यात आले आहे. ही शासकीय नोंद असली तरी अनधिकृत सावकारीचा व्यवसायही मोठा आहे. त्यांच्याकडूनही अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्याची कुठेच नोंद नाही. अधिकृत सावकारांकडून शेती तारणावर नऊ टक्के वार्षिक, बिगरशेती तारणासाठी १५ टक्के, बिगरतारणासाठी १२ टक्के व बिगर शेती विनातारण कर्जासाठी १८ टक्के व्याज आकारले जाते. 

बिगरशेतीसाठीच अधिक कर्ज 
विभागात शेतीविषयक कर्ज घेणाऱ्यांची संख्या बिगरशेतीसाठी (व्यापारी) कर्ज घेणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. १४६ कोटी ९५ लाख ९५१ शेतकऱ्यांनी १६७ कोटी ४९ लाख रुपये कर्ज घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण अकोला जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ७८७ शेतकऱ्यांनी १४४ कोटी ३८ लाख रुपये, त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ९९ शेतकऱ्यांनी १४ कोटी ५६ लाख, यवतमाळमध्ये तीन हजार ९०७ शेतकऱ्यांनी ४ कोटी ७९ हजार व वाशीम जिल्ह्यात दोन हजार ४ शेतकऱ्यांनी २ कोटी ९९ लाख रुपये कर्ज घेतले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...