agriculture news in Marathi, two lac liter milk procurement decrease in Parbhani, Maharashtra | Agrowon

परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख लिटरची घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

शासकीय यंत्रणेची शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्याची मानसिकता नाही. गेल्या काही महिन्यांपासून पेमेंट वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचा खुराक, चारा वैरणीची व्यवस्था करण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून दुधाळ जनावरांची विक्री केली.
- भगवान सावंत, संचालक, दूध उत्पादक संस्था, जवळा बाजार, जि. हिंगोली.

परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात २ लाख २१ हजार ६३१ लिटरने घट झाली. यंदा जून महिन्यात १३ लाख ३९ हजार ५७२ लिटर दूध संकलन झाले होते; तर जुलै महिन्यामध्ये ११ लाख १७ हजार ९४१ लिटर दूध संकलन झाले. दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याची उपलब्धता नसल्यामुळे; तसेच देयके वेळेवर मिळत नसल्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे.   
शासकीय दुग्धशाळेअंतर्गंत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील दुधाचे संकलन केले जाते. जुलै महिन्यात प्रतिदिन सरासरी ३६ हजार ६३ लिटर याप्रमाणे एकूण ११ लाख १७ हजार ९४१ लिटर दूध संकलन झाले. यामध्ये परभणी तालुक्यातील ३ लाख ६३ हजार ५०५ लिटर दूध संकलन झाले. पाथरी येथील शीतकरण केंद्राअंतर्गत ४ लाख ४७ हजार २५४ लिटर दूध संकलन झाले. गंगाखेड येथील शीतकरण केंद्राअंतर्गत १ लाख  ८६ हजार ७२५ लिटर दूध संकलन झाले.

हिंगोली जिल्ह्यातील ९१ हजार ३६ लिटर दूध संकलन झाले. नांदेड जिल्ह्यातील २९ हजार ४२१ लिटर दूध संकलनाचा समावेश आहे. जून महिन्यात एकूण १३ लाख ३९ हजार ५७२ लिटर दूध संकलन झाले होते. त्यामध्ये परभणी तालुक्यातील ४ लाख ५३ लिटर, पाथरी शीतकरण केंद्रात ५ लाख ३१ हजार ३५९ लिटर, गंगाखेड शीतकरण केंद्रामध्ये १ लाख ९७ हजार ४०१ लिटर, हिंगोली जिल्ह्यात १ लाख ४८७ लिटर, नांदेड जिल्ह्यातील ४३ हजार ३०३ लिटर दूध संकलन झाले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून दुधाची देयके वेळेवर मिळेनासे झाले. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली. संकलन करणाऱ्या व्यवस्थानाकडून अनास्था दाखविली जात आहे. अनेकदा अतिरिक्त दूध ठरवून नाकारले जात आहे. त्यात एप्रिल महिन्यापासून दूध देयके देण्यास दोन दोन महिन्यांचा कालावधी लावला जात आहे.

सद्यस्थितीत जुलै महिन्यातील देयके प्रलंबित आहेत. पाऊस उशिरा आल्यामुळे चाऱ्याची कमतरता आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची विक्री करून दुग्धव्यवसाय बंद केले. मुळे शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनात घट झाली आहे.

जुलै महिन्यातील दूध संकलन स्थिती (लिटरमध्ये)

शीतकरण केंद्र दूध संकलन
परभणी  ३६३५०५
पाथरी   ४४७२५४
गंगाखेड   १८६७२५
हिंगोली  ९१०३६
नांदेड २९४२१

 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...