परभणी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या विमा कंपनीकडे दोन लाख पूर्वसूचना

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत नुकसानभरपाईसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या २ लाख १ हजार १६४ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत.
Two lakh advance notice to crop loss insurance company in Parbhani district
Two lakh advance notice to crop loss insurance company in Parbhani district

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत नुकसानभरपाईसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या २ लाख १ हजार १६४ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. त्यापैकी सोमवार (ता.२०) पर्यंत १ लाख ४ हजार ९०५ शेतकऱ्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेदरम्यान नुकसान आढळून न आल्यामुळे २ हजार ८६५ पूर्वसूचना अपात्र ठरल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

टोल फ्री नंबरव्दारे विमा कंपनीचे कॉल सेंटर, ई मेल, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर (एनसीआयपी) ऑनलाइन पध्दतीने तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे ऑफलाइन अशा चार पध्दतीने पीकविमाधारक शेतकऱ्यांनी पीकनुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात जुलै, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुरवातीला वाढीच्या, तर त्यानंतर परिपक्वतेच्या अवस्थेतील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गंत विमापरतावा मिळण्यासाठी  घटनेनंतर ७२ तासांच्या आत नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार टोल फ्री नंबरवरुन कॉल सेंटरकडे १७ हजार ९७८ पूर्वसूचना, ई मेलव्दारे २ हजार ७२६ पूर्वसूचना, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर १ लाख २२ हजार ३४३ पूर्वसूचना, तर शेतकऱ्यांनी स्वतः (ऑफलाइन ) विमा कंपनी प्रतिनिधींकडे ५८ हजार ११७ पूर्वसूचना असे मिळून एकूण २ लाख १ हजार १६४ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com