जगभरात दोन लाख बळींचा टप्पा ओलांडला; कोरोनाचा कहर सुरूच

कोरोनाच्या विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनामुळे जगभरातील बळींच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे ५० हजारांहून अधिक बळी गेल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
जगभरात दोन लाख बळींचा टप्पा ओलांडला; कोरोनाचा कहर सुरूच
जगभरात दोन लाख बळींचा टप्पा ओलांडला; कोरोनाचा कहर सुरूच

वॉशिंग्टन : कोरोनाच्या विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनामुळे जगभरातील बळींच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे ५० हजारांहून अधिक बळी गेल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील जॉन हॉप्कीन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २.८ दशलक्ष एवढी झाली आहे. ११ जानेवारीला पहिला रुग्ण कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ११ जानेवारी रोजी चीनमध्ये पहिला बळी गेला होता. त्यानंतर आजपर्यंत या विषाणूचे रुग्ण २१० देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आले आहे. एकप्रकारे कोरोनाच्या संकटाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. टॉप पाईव्ह देश जगातील एकूण पाच देशांना कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पाच देशांमध्ये २० हजारांहून अधिक जणांचे बळी या विषाणूने घेतले आहेत.

  • अमेरिका
  • इटली
  • स्पेन
  • फ्रान्स
  • ब्रिटन
  • फ्रान्समध्ये मृत्यूदरात घट

  • शनिवारी अमेरिकेतील बळींची संख्या ५३ हजारांच्या पुढे गेली
  • ब्रिटनमध्ये शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २० हजारांच्या वर गेली
  • ब्रिटनमध्ये फक्त रुग्णालयातील मृतांची संख्या मोजली जात असल्याने मूळ बळींची संख्या अधिक असण्याची शक्यता
  • एकट्या फ्रान्समध्ये शनिवारी ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
  • फ्रान्समधील मृत्यूदरात घट होत आहे
  • धोका वाढतोय

  • कोरोणाची बाधा झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा या विषाणूची लागण होऊ शकते, असा इशारा डब्लूएचओने दिला आहे.
  • ऑनलाइन छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, सरकारी मालकीच्या ब्रिटनमधील रिव्हेंज पोर्न हेल्पलाइनकडे मदतीसाठी येणाऱ्या दूरध्वनींची संख्या वाढली
  • बेलारूसमधील एका अनाथलायातील १३ अपंग मुलांना आणि १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
  • पश्चिम युरोपातील रुग्णांची संख्या स्थर आहे किंवा घटताना दिसते आहे. मात्र सुरवातीच्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या काही देशांमध्ये दुसरी लाट येण्यास सुरवात झाली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. - डॉ. टेड्रोस घेब्रियेसूस, डब्लूएचओचे प्रमुख दुसऱ्या लाटेची शक्यता

  • आफ्रिका
  • पूर्व युरोप
  • मध्य अमेरिका
  • दक्षिण अमेरिका 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com