Agriculture news in marathi Two lakh farmers waiting for crop loan in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी पीककर्जाच्या प्रतिक्षेत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अद्याप १ लाख ९७ हजार ५०६ शेतकरी कर्ज मिळण्याची वाट पहात आहेत. गेल्या आठवडाभरात ४ हजार ५२ शेतकऱ्यांना ३६ कोटी ८९ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले.

अर्ध्याहून अधिक खरीप हंगाम संपला तरी पीककर्ज वाटपात गती आलेली नाही. यंदा सोमवार (ता.३) पर्यंत जिल्ह्यातील विविध बॅंकांनी ७० हजार ४९४ शेतकऱ्यांना ३९६ कोटी २९ लाख ७३ हजार रुपये (१९.५१ टक्के) पीककर्ज वाटप केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीककर्जवाटपाची उद्दिष्टपुर्ती केली आहे. व्यापारी आणि खाजगी बॅंकांचे कर्जवाटप ६ टक्केच्या आत, तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे कर्जवाटप २० टक्केच्या आतच रेंगाळत आहे. बॅंका जुन्या कर्जधारकांना पीककर्ज मंजुरीसाठी फेरफार नक्कल, टोच नकाशा, बेबाकी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मागत आहेत.

शेतकऱ्यांना त्यासाठी तलाठी तसेच अन्य बॅंकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

सार्वजिनक क्षेत्रातील, सहकारी तसेच खाजगी बॅंकांना या वर्षीच्या खरीप हंगामात एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. सोमवार (ता.३) अखेर जिल्हा बॅंकेने ५५ हजार १२५ शेतकऱ्यांना २५८ कोटी २६ लाख १८ हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या १३९.०४ टक्के पीक कर्जवाटप केले. 

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ८ हजार २०१ शेतकऱ्यांना ५४ कोटी ७२ लाख ४ हजार रुपये, व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी ७ हजार १६८ शेतकऱ्यांना ८३ कोटी ३१ लाख ५१ हजार रुपये एवढे पीककर्ज वाटप केले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...