agriculture news in marathi, Two lakh kamgand trails planted by farmers: Vijay Moinkar | Agrowon

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लावले २ लाख कामगंध सापळे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

जालना : गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी यंदा कृषी विभागासोबतच शेतकऱ्यांनीही कंबर कसली आहे. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी प्रोत्साहित होऊन स्वखर्चाने २ लाख कामगंध सापळे कपाशी पिकात लावले. याला २० हजार ४२१ अनुदानावरील सापळ्यांची जोड मिळाली. लिंबोळी अर्काचीही अनेक शेतकऱ्यांनी फवारणी घेतल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.

जालना : गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी यंदा कृषी विभागासोबतच शेतकऱ्यांनीही कंबर कसली आहे. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी प्रोत्साहित होऊन स्वखर्चाने २ लाख कामगंध सापळे कपाशी पिकात लावले. याला २० हजार ४२१ अनुदानावरील सापळ्यांची जोड मिळाली. लिंबोळी अर्काचीही अनेक शेतकऱ्यांनी फवारणी घेतल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.

माईनकर म्हणाले, ‘‘यंदा जालना जिल्ह्यात २ लाख ९४ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जूनपासूनच मोहीम हाती घेतली होती. चित्ररथाद्वारे, प्रत्यक्षिकांमधून, गावोगावी बोन्ड अळी नियंत्रणासाठी उपाय योजले गेले. नुकतेच धालसखेडा व पराडा येथे जिल्हा मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नियंत्रणाचा भाग म्हणून कृषी विभागामार्फत १ लाख कृषी सल्ला पत्रकांचे वाटप केले जात आहे. १५०० भित्तीपत्रके विविध गावात लावण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कडेगाव, केदारखेड, हरपाळा, वाढोना, लावणी, बनटाकळी, ढाकेफळ या आठ गावात ट्रायकोकार्डचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामधून गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मदत झाली.

 ज्या गावामध्ये अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर दिसला, त्या गावशिवरातील कपाशी पिकावर प्रोफेनोफास २० ईसी (२० एमएल) प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. दुसरी फवारणी थायोडिकारब २० ग्राम प्रति १० लिटर पाण्यामध्ये (साध्या पंपासाठी) मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...