सोलापुरात 'सन्मान'ची सव्वा दोन लाखांवर नावे पात्र

सोलापुरात 'सन्मान'ची सव्वा दोन लाखांवर नावे पात्र
सोलापुरात 'सन्मान'ची सव्वा दोन लाखांवर नावे पात्र

सोलापूर : सोलापुरात प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रविवारी (ता.२४) येथे प्रारंभ करण्यात आला. या योजनेसाठी जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. पण पहिल्या टप्प्यात जवळपास २ लाख २७ हजार कुटुंबांची नावे या योजनेसाठी पात्र ठरली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, कृषी उपसंचालक रवींद्र माने आदींची उपस्थिती होती. प्रधानमंत्री किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांचा सत्कार पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. 

भोसले यांनी या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलून, अभ्यास करून शेतीकडे लक्ष द्यावे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी आहेत. त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न प्रशासन पातळीवर सातत्याने होत असतो. शेतकऱ्यांनीही त्याचा लाभ घ्यावा.'' गोरखपूर येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण या वेळी करण्यात आले. 

२० शेतकऱ्यांचा सन्मान उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर माळी, गहीनीनाथ कारंडे, सुमन गजघाटे, नितीन गायकवाड, बाळासाहेब गुंड, ज्ञानेश्वर सुरवसे, मंजूर मुलाणी, मच्छिंद्र निळ, महादेव भोसले, प्रभु साठे, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनिल दिलपाके, नागेश बिराजदार, शिवयोगी बिराजदार, बाबु हक्के, मळसिद्ध जमादार, शिवबसप्पा फताटे, लालासो शेख, बसवराज कुंभार, उमेश मळेवाडी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.

१ मार्चपूर्वी जमा होणार पहिला हप्ता   जिल्ह्यात ११४४ गावे आहेत. यापैकी ११२५ गावातील ३ लाख ५८ हजार कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली. त्यापैकी २ लाख २७ हजार कुटुंबांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्याची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली. येत्या एक मार्च पूर्वी पहिला हप्ता जमा होणार आहे. १ फेब्रुवारी ही तारीख धरून कुटुंबातील सदस्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती या वेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com