परभणी जिल्ह्यात ‘मनरेगा’ची पावणे दोन लाखांवर कामे प्रस्तावित

Two lakhs of works have been proposed for 'MNREGA' in Parbhani district
Two lakhs of works have been proposed for 'MNREGA' in Parbhani district

परभणी : जिल्ह्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या वर्षाचे ३ हजार ८१२ कोटी ८८ लाख १९ हजार मजूर अंदाजपत्रक (लेबर बजेट) आणि वार्षिक कृती आराखड्यास शुक्रवारी (ता. ३१) मंजुरी देण्यात आली. आयोजित जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही मंजुरी मिळाली.

यंदाच्या ‘मनरेगा’च्या वार्षिक कृती आराखड्यातील ११ कलमी कार्यक्रमांतर्गत कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित १ लाख ७८ हजार ५७७ कामांचा समावेश आहे. नोंदणीकृत मजुरांना १० कोटी ६४ लाख ५२ हजार मनुष्य दिन रोजगार उपलब्ध होईल. 

‘मनरेगा’च्या आराखड्यामध्ये ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांकडून कामे केली जाणार आहेत. त्यात कृषीशी संबंधित शेततळ्यांची १ हजार ६४२ कामे, मागेल त्याला शेततळ्याची ४ हजार ४४० कामे, व्हर्मी कंपोस्टची ९ हजार ३७ कामे, नाडेप कंपोस्टची ९ हजार ६१४ कामे, फळबाग लागवडीची ५ हजार १०९ कामे, तुतीलागवडची २३ हजार २३४ कामे, गाव तलावांची ४७७ कामे, पांरपरिक पाणीसाठ्याचे नूतनीकरणाची १० कामे, जलसंधारणाची २३ हजार ४२५ कामे, शेळी पालनासाठी निवाऱ्याची ३ हजार ५ कामे, कुक्कुटपालन निवाऱ्याची ३ हजार ८ कामे, गुरांच्या गोठ्याची ३ हजार ३६६ कामे, रोपवाटिकेची ४ हजार ५८९ कामे, वृक्षलागवड व संगोपनाची ११ हजार ११ कामाचा समावेश आहे.

नोंदणीकृत मजुरांची संख्या ५ लाख ६ हजार १४२ एवढी आहे. कामाची मागणी करणाऱ्या कुटुंबांची संख्या १ लाख २० हजार ३७६ एवढी आहे.२ कोटी ९१ लाख  ६६ हजार मनुष्य दिन कामाची मागणी आहे. अध्यक्षा निर्मला विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्वाती सूर्यवंशी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा कापसे आदीसह विभाग प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

दोन लाखांवर कुटुंबांची नोंदणी

ग्रामविकाच्या कामामध्ये गाव रस्त्यांची ४ गजार ३५५ कामे, घरकुलाची ११ हजार १७७ कामे, शोषखड्डेनिर्मितीची १३२ हजार ७३१ कामे, स्वच्छतागृह बांधकामाची ११ हजार ३०० कामे, अंगणवाड्यांची ६९१ कामे, क्रीडांगणाची ३८६ कामे, स्मशानभूमी सुशोभीकरणाची ४८० कामे, गावांतर्गत रस्त्यांची ४ हजार ३५५ कामे, ग्रामपंचायत भवन बांधकामाची २७१ कामे यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत २ लाख ३४ हजार ५९२ मजुर कुटुंबांनी नोंदणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com