पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन महिने बंदी

कीटकनाशक
कीटकनाशक

मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच कीटकनाशकांची पुढील दोन महिन्यांसाठी विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात नमूद कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ही कीटकनाशके अति विषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचे दिसून आले आहे. या कीटकनाशकांमध्ये प्रोफेनोफोस ४० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्यूजी, ॲसिफेट ७५ टक्के, डायफेन्थ्युरॉन ५० टक्के डब्ल्यूपी आणि मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल आदींचा समावेश आहे. कीटकनाशकांमुळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेतल्यानंतर केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाची विक्री, वितरण व वापर करण्यास  बंदी घालण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी सांगितले. धोकादायक कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजूर यांवर उपचार सुरू असल्याचेही कृषिमंत्री डॉ.  बोंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com