राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या २२०

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणखी १७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे.
Corona_Patient
Corona_Patient

पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणखी १७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे. तसेच, कोरोनाबाधीत दोन रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यापैकी एक पुण्याचा रुग्ण असून, दुसरा मुंबईचा आहे. आतापर्यंत या आजाराने राज्यात दहा जणांचा बळी घेतला आहे. नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. राज्यात करोना बाधित दोन रुग्णांचे मृत्यू झाले. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर, करोना बाधित ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यात ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १८ जानेवारीपासून आजपर्यंत चार हजार ५३८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी तीन हजार ८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती होम क्वारंटाइन असून एक हजार २२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुण्यात तीन नवीन रुग्ण पुण्यातील तीन रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यातील दोन रुग्ण हे एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. तर, तिसरा रुग्ण हा बर्म्युडा येथून प्रवास करून पुण्यात आला आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील कोरोना उद्रेक

जिल्हा / मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई ९२
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ४३ 1
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३
नागपूर १६
यवतमाळ
नगर
सातारा, कोल्हापूर
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलडाणा, नाशिक प्रत्येकी १ (बुलडाणा)
इतर राज्य (गुजरात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com