agriculture news in Marathi two new butterfly species identify in Nagpur Maharashtra | Agrowon

दोन नव्या फुलपाखरांना नागपुरात मिळाला अधिवास 

विनोद इंगोले
शुक्रवार, 5 मार्च 2021

पर्यावरण संरक्षणासोबतच पीक परागीकरणात फुलपाखरांची मोलाची भूमिका राहते. नजीकच्या काळात लॉकडाउनमुळे प्रदूषणाची मात्रा काही अंशी कमी झाल्याने ऑरेंज सिटीत दोन नव्या प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. 

नागपूर ः पर्यावरण संरक्षणासोबतच पीक परागीकरणात फुलपाखरांची मोलाची भूमिका राहते. नजीकच्या काळात लॉकडाउनमुळे प्रदूषणाची मात्रा काही अंशी कमी झाल्याने ऑरेंज सिटीत दोन नव्या प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. इंडियन पाम फ्लाय व रेड आय अशी या दोन प्रजातींची नावे आहेत. पश्‍चिम घाटातील पाम झाडांवर मुख्यत्वे पाम फ्लाय या फुलपाखराचा अधिवास राहतो. 

नागपुरातील डॉ. आशिष टिपले जून २००५-०६ पासून फुलपाखरू संशोधनावर काम करीत आहेत. २००९ पर्यंत त्यांनी १४५ प्रजातींची अधिकृत यादी तयार केली. त्यानंतर २०२० मध्ये त्यात चार प्रजातींची नव्याने भर पडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात पाम फ्लाय व रेड आय या दोन प्रजातींची फुलपाखरू आढळून आली आहेत.

यातील पाम फ्लाय या फुलपाखराचा अधिवास महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटातील आहे. सौंदर्यीकरणासाठी या झाडांची आयात करण्यात आली. अशाप्रकारे पाम झाडांची संख्या वाढीस लागली आणि या झाडांसोबतच फुलपाखरांच्या लार्व्हा देखील स्थलांतरित झाल्या. अनुकूल वातावरणामुळे त्यांची वाढ झाली. यापूर्वी चंद्रपूर, ताडोबा व पेंचच्या परिसरात पाम फ्लाय आढळून आले आहेत. 

फुलपाखरे हे वातावरणाचे सूचक आहेत. एखाद्या अधिवासात आपण गेलो तर त्या ठिकाणी आपणास फुलपाखरू दिसले. त्यावरुन त्या भागातील वातावरण प्रदूषित आहे किंवा नाही हे निश्‍चित करता येते. प्रदूषित असेल तर २० आणि कमी प्रदूषित असेल, तर त्यापेक्षा अधिक फुलपाखरांच्या जाती दिसतात. पॉलीनेशन (परागीकरण) क्रियेतही यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे अन्नसाखळीतील फुलपाखरांचे देखील योगदान मोठे आहे.

१०० पैकी दोन ते तीन प्रजातींमधील फुलपाखरांपासून नुकसान संभावते. लाइम बटरफ्लाय, ब्ल्यू मोरमॉन, कॉमन मोरमॉन हे त्यातील काही. यांच्यापासून फक्‍त लिंबूवर्गीय पिकांना धोका राहतो. ग्रीन सिटी म्हणून नागपूरमध्ये सध्या फुलपाखरांची संख्या टिकून आहे. वृक्षतोड झाल्यास ती कमी होईल. 

प्रतिक्रिया
२० वर्षांपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भ या भागांत फुलपाखरांवर अभ्यास सुरू आहे. पहिल्यांदाच नागपुरात रेड आय आणि पाम फ्लाय या प्रजाती दिसून आल्या आहेत. फुलपाखरांचा अधिवास असेल तर भाग वातावरणीयदृष्ट्या पोषक ठरतो. 
- डॉ. आशिष टिपले, फुलपाखरू अभ्यासक


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...