agriculture news in Marathi, two percent interest rate for sugar cane drop irrigation for farmers, Maharashtra | Agrowon

ऊसाला ठिबकसाठी दोन टक्क्याने कर्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

शेतकऱ्यांना कमी व्याजात ऊस लागवडीसाठी ठिबक संचाकरिता कर्ज देण्याची राष्ट्रीयीकृत बॅंकांची भूमिका स्तुत्य आहे. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. नाबार्डचा निधी उपलब्ध होताच या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
- संभाजी कडूपाटील, साखर आयुक्त

पुणे : पाण्याची बचत व ऊस उत्पादकता वाढीसाठी कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बॅंका देखील तयार झालेल्या आहेत. केवळ दोन टक्के व्याजात ठिबकसाठी कर्जवाटप लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील तीन लाख हेक्टरवरील ऊस लागवड येत्या दोन वर्षांत ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर सारख्या दुष्काळी भागातील ३५ साखर कारखाने या योजनेखाली आणले जातील. 

साखर कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना ऊस लागवड करताना ठिबक बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी ८५ हजार रुपये कर्ज पाच वर्षांकरिता किमान पाच हेक्टरसाठी मिळेल. ही योजना राबविण्यासाठी नाबार्डकडून आधी बॅंकांना कर्ज वाटले जाईल. पहिल्या टप्प्यात नाबार्डकडून शिखर बॅंकेला साडेपाच टक्क्यांनी कर्ज दिले जाईल. शिखरकडून सहा टक्क्यांनी जिल्हा बॅंकांना आणि शेतकऱ्यांना सव्वा सात टक्क्यांनी कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. 

‘‘कर्जवाटपाच्या या प्रक्रियेत बॅंकांनाही चांगला व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे. शासन व साखर कारखान्यांचे व्याज हमखास मिळणार असल्यामुळे या योजनेत सहभागाचा प्रयत्न राष्ट्रीयकृत बॅंकादेखील करीत होत्या. त्यांची मागणी मान्य केली गेली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून या बॅंकांना दोन टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारता येणार नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन टक्केच व्याज द्यावे लागणार
ऊस ठिबक योजनेसाठी व्याजदर सव्वासात टक्के ठेवला गेला आहे. मात्र, शेतकरी केवळ दोन टक्के व्याज भरणार आहे. शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासन चार टक्के तर साखर कारखाना सव्वा टक्के व्याज भरणार आहे. प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्याला पाणी पट्टीत २५ टक्के सवलत मिळणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...