Agriculture news in Marathi Two ration shop owners' licenses canceled in Khed | Agrowon

खेडमध्ये दोन रेशन दुकानदारांचे परवाने रद्द

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

पुणे  ः नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर रेशन दुकानाची पाहणी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करणे, त्याची नोंद न ठेवणे, कार्ड धारकांशी उद्धटपणे वागणूक देणे अशा कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व प्रत्यक्ष स्थळपाहणी खेड तहसीलदारांनी केली. त्यानंतर निदर्शनास आलेल्या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असल्याची माहिती खेड तहसीलदार कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  

पुणे  ः नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर रेशन दुकानाची पाहणी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करणे, त्याची नोंद न ठेवणे, कार्ड धारकांशी उद्धटपणे वागणूक देणे अशा कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व प्रत्यक्ष स्थळपाहणी खेड तहसीलदारांनी केली. त्यानंतर निदर्शनास आलेल्या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असल्याची माहिती खेड तहसीलदार कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  

तालुक्यातील पांगरी येथील संभाजी बाजीराव तळेकर, वडगाव घेनंद येथील संपत बाबुराव बवले यांच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशन धारकांना शासनाने दिलेल्या साठ्यापेक्षा कमी धान्य देण्यात येत होते. आलेल्या धान्याची नोंद ठेवली जात नव्हती. भाव फलकावर भाव लिहिले जात नव्हते, स्टॉक पत्रक भरले जात नव्हते आणि आलेल्या रेशनकार्ड धारकांशी उद्धट बोलले जात असल्याच्या अनेक तक्रारी तालुका पुरवठा विभाग व तहसीलदार यांच्याकडे आल्या होत्या. 

त्यानुसार मंडलाधिकारी, पुरवठा अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी भेटी देऊन संबंधित दुकानदारांची कानउघाडणी केली होती. मात्र, त्यात बदल होत नसल्याने या दोन दुकानदारांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून त्यानंतर या दुकानावर मोठी कारवाई केली जाणार आहे.

पांगरी येथील संभाजी बाजीराव तळेकर यांचा परवाना तात्पुरता रद्द करून बुट्टेवाडी येथील आशा प्रभाकर पोळ यांच्या स्वस्त धान्य दुकानात पुढील आदेश येईपर्यंत धान्य वाटप होणार आहे. वडगाव घेनंद येथील संपत बाबुराव बवले यांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत भोसे येथील अरूण हलगे यांच्या दुकानातून धान्य वाटप केले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...