Agriculture news in Marathi, Two thousand 354 crop experiments in Pune district | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी प्रयोग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी खरीप हंगामात पीकविमा योजनेअंतर्गत मंडळनिहाय गटांमध्ये प्रत्येक पिकांसाठी किमान बारा प्रयोग घेणे अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात एकूण दोन हजार ३५४ एवढे पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी खरीप हंगामात पीकविमा योजनेअंतर्गत मंडळनिहाय गटांमध्ये प्रत्येक पिकांसाठी किमान बारा प्रयोग घेणे अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात एकूण दोन हजार ३५४ एवढे पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

खरीप हंगाम २०१९-२० अंतर्गत पुणे जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग हे पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. पीक कापणीचे प्रयोग विहित कालमर्यादेत पूर्ण करून त्याची माहिती पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र शासनास सादर केली जाते. पीक कापणी प्रयोग महसूल ग्रामविकास व कृषी या तिन्ही यंत्रणांमार्फत करण्यात येते. पिकांची उत्पन्नाची आकडेवारी कृषी विभागाला अचूक व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. 

समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका विकास अधिकारी ग्रामीण बॅंकेचे तालुक्याचे बॅंक प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी आहेत. तसेच, ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, विमा प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी सदस्य आहेत. पीक कापणीच्या वेळी ग्रामस्तरीय समितीमधील सदस्य उपस्थित राहणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगासाठी मोबाईल अॅप बंधनकारक आहे.

तालुकानिहाय संख्या 
हवेली १६८, मुळशी ११६, भोर २१६, मावळ १३८, वेल्हे ११४, जुन्नर १३२, खेड ३००, आंबेगाव १७६, शिरूर २८८, बारामती १९०, इंदापूर १८२, दौंड १५५, पुरंदर १७९.


इतर ताज्या घडामोडी
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...
सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख...सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे...
सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३०...सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसआरआय`ने होणार...सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि...
दुधात नफा नव्हे; उत्पादन खर्चातच पाच...नगर ः दूध व्यवसाय टिकण्याचा कितीही प्रयत्न केला...
पुणे जिल्ह्यात युरिया टंचाईपुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असल्याने...
अकोल्यात सोयाबीन बियाणेप्रकरणी २९५७...अकोला ः जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची उगवण न...
जत पूर्व भागात पेरलं; पण उगवलंच नाहीउमदी, जि. सांगली : एकीकडे कोरोनाचे थैमान; तर...
वैरागमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणे...सोलापूर  : सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे...
जळगावात लॉकडाउनमुळे खते गेली परतजळगाव ः जिल्ह्यात खतांची टंचाई आहे. यातच जळगाव,...
यवतमाळ जिल्ह्यात पेरणीनंतर मिळणार बियाणेयवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे...
जळगावच्या पूर्व भागात पावसाचा लहरीपणाजळगाव ः जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्क्यांवर पाऊस...
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी अध्यादेश...नाशिक : केंद्र सरकारने अलीकडेच शेतीसंबंधी तीन...
पीकविमा योजनेच्या निकषांत बदल गरजेचा ः...नांदेड : इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नांदेड...