नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती अधिकारांतर्गत दोन हजार अर्ज

माहिती अधिकारांतर्गत माहिती देणे गैर नाही. परंतु, ठरावीक लोक वारंवार माहिती मागत असल्याचे दिसते. त्यामुळे कामकाजावर नक्कीच परिणाम होतो. अनेकदा तर प्रश्‍नार्थक माहितीही मागितली जाते. अनेकांच्या अर्जावरून वैयक्तिक फायदा किंवा हित दडलेले असल्याचे जाणवते. - वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.
नगर जिल्हा परिषद
नगर जिल्हा परिषद

नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची माहिती मिळण्यासाठी दर दिवसाला माहिती अधिकारातंर्गत सुमारे अकरा ते बारा अर्ज प्राप्त होत आहेत. गेल्या सहा महिन्यांत तब्बल दोन हजार अर्जाद्वारे विविध योजनांची माहिती मागितली गेली असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

सरकारी यंत्रणेने केलेले काम, त्यावर झालेला खर्च यांसह अन्य तांत्रिक बाबी योग्य झाल्या आहेत का, याची माहिती मिळावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर माहिती अधिकाराचा कायदा अंमलात आला. शासकीय कार्यालयातील गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून माहितीचा अधिकार कायदा झाला असला तरी मात्र या अधिकाराचा काही जणांकडून गैरवापरही होत असल्याचे राज्यात दिसून आले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेतून प्रभावी कामे केली जातात.

लोकांशी निगडित असलेल्या या कामांची माहिती मिळावी, यासाठी माहिती अधिकाराचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी केवळ राजकारणापोटी त्रास देण्यासाठी आणि एकमेकांची जिरवण्यासाठीही माहिती आधिकाराचा वापर होत असल्याचे सांगण्यात आले. काही समाजसेवक ‘चिरीमिरी’ मिळण्यासाठीही माहिती अधिकाराचा वापर करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या चौदा विभाग व चौदा पंचायत समित्यांत जानेवारी महिन्यात २९४, फेब्रुवारीत २४३, मार्चमध्ये ३२६, एप्रिलमध्ये २८५, मेमध्ये २९७ आणि जूनमध्ये विक्रमी ३७० अर्ज माहितीच्या अधिकारात प्राप्त झाले होते. या सहा महिन्यांत विक्रमी १८९५ अर्ज आले आणि त्यापैकी ९० टक्के अर्जांवर माहितीही देण्यात आली. या सहा महिन्यांत शिक्षण विभागात सर्वाधिक २६३ अर्ज आले. त्यात प्राथमिक विभागासाठी १२३ जणांनी तर माध्यमिक विभागाची १४० जणांनी माहिती मागविली होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com