भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन हजार अर्ज

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन हजार अर्ज
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन हजार अर्ज

पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी पाच लाख रुपयांचे आर्थिक उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी दोन हजार १८५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पर्यायी उत्पन्नाचा नवीन स्राेत निर्माण करणे, लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी फळझाडांच्या लागवडीस चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सात आॅगस्ट ही अंतिम मुदत होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त कलमांद्वारेच लागवड (अपवाद नारळ), घन लागवड, इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आदी बाबी राबविता येणार आहे.

या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, नारळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी फळपिकांची लागवड करता येणार आहे.

योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना कमाल दहा हेक्टर तर उर्वरित विभागासाठी कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ घेता येणार आहे. तसेच लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतर्गत लाभ घेतला असलेले शेतकरी वगळून कोकणातील दहा आणि उर्वरित महाराष्ट्रातील सहा हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच्या उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत राहील. योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. त्यासाठी कमीत कमी ४३,५९६ ते जास्तीत जास्त १,०९,४८७ रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com