शेतकरी कर्जमाफीसाठी दोन हजार कोटी वितरित ः सहकारमंत्री पाटील

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली असून, जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्यासाठी दोन हजार कोटींचा निधीसुद्धा वितरित करण्यात आला आहे.
Two thousand crore distributed for farmers' loan waiver: Co-operation Minister Patil

सहकारमंत्री पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोरोनाचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.

सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी २ हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलैअखेरपर्यंत सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात सुमारे ८ हजार २०० कोटी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकारमंत्री पाटील यांनी केले.

‘कर्जदार शेतकऱ्यांना लाभ द्या’ दरम्यान, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या; मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे, अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या, असेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com