Agriculture news in Marathi Two thousand crore loss to truck transporters | Agrowon

ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका विदर्भातील मालवाहू वाहतूकदार, व्यापारी व शेतकऱ्यांना बसला आहे.

अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका विदर्भातील मालवाहू वाहतूकदार, व्यापारी व शेतकऱ्यांना बसला आहे. नेहमीचा मार्ग सोडून सध्या राजस्थानमार्गे वाहतूक करावी लागत असल्याने त्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांचे देखील १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता वाहतूक सुरू झाली असली, तरी ती सुरळीत नाही. परिणामी, मालवाहतूक राजस्थानमार्गे करण्याची वेळ आली आहे. यामुळे माल पोहोचण्यास विलंब होत असून, भाडेदेखील वाढले आहे. दिल्लीहून मालवाहू ट्रक विदर्भात आला तर जातेवेळी तो संत्रा अथवा करारानुसार इतर माल घेऊन परत जातो. आधी अमरावती, नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांत दररोज असे दोनशे ट्रक दिल्लीहून येत होते. आता त्यांची संख्या रोडावली आहे.

दिल्ली आणि विदर्भातील जिल्ह्यांमधून मालासाठी पूर्वनोंदणी कमी झाली आहे. सध्या गोदामात शिल्लक माल असल्याने वस्तूंचे दर नियंत्रित आहेत. मात्र आंदोलन अधिक काळ चालले तर जानेवारी वा फेब्रुवारीत हे दर वाढण्याची शक्‍यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे.

आंदोलनामुळे विदर्भात माल विलंबाने पोहोचत आहे. सुरुवातीला स्थानिक मालवाहतूकदारांनी दिल्लीकडे जाण्यास नकार दिला होता. त्याचा फटका बसला. आता इतर मार्गे मालवाहतूक सुरू आहे. मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. यामुळे विदर्भाच्या व्यापाऱ्यांचे दोन हजार कोटींचे नुकसान होत आहे, असे  कॉन्फ्रिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या...बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या...पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व...
पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्यानाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव...
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली...कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या....
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते...सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला...
‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन...अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई...
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने...
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने...नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात...
म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात... सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू...
कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे ः डॉ....अंबाजोगाई, जि. बीड : नोकरीच्या मागे न लागता...
डीएड पदविका घेऊन शेतीत रमल्या दोघी जावाऔरंगाबाद : घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समजदारीने...
संघर्षातून उभारली ‘तिने’शेतकरी उत्पादक...नाशिक : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने...
शेती, वृक्षसंवर्धनातील महिला शक्तीचिपको आंदोलनापासून प्रेरणा घेत अनेक संस्था, तरुण...
पुण्यात काकडी, लिंबाच्या दरांत सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय...नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नांदेडमध्ये थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना...नांदेडमध्ये : ‘‘कृषी पंपाच्या वीज थकबाकीतून...
धुळ्यातील भाजप सदस्यांची सर्वोच्‍च...सोनगीर, जि. धुळे : धुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील...
कृषी व्यवसाय प्रकल्पा’साठी पाच हजार...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात मा. बाळासाहेब...
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात आगीने...गिरणारे, जि. नाशिकच्या : वनक्षेत्रात...