नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी शासनाकडून वितरीत

पीक नुकसान
पीक नुकसान

मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍यांमधील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने दोन हजार ५९ कोटी वितरित केले आहेत. सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच ‘‘संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करावी तसेच या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नये,’’ असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. राज्यात ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये क्‍यार व ‘महा’चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबरला मुंबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार शेतीपिकांसाठी प्रति हेक्‍टरी ८ हजार व बहूवार्षिक फळबागांसाठी प्रति हेक्‍टरी १८ हजार दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.  याबाबत शासनाने १८ नोव्हेंबरला शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार नुकसान झालेल्या ३४ जिल्ह्यांसाठी २०५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रचलित नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिकच्या नुकसानीला मदत दिली जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करावी. या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा निहाय मंजूर मदत (कोटींत)

ठाणे  ८.२० कोटी
पालघर  ९.७३ कोटी
रायगड  ५.१७ कोटी
रत्नागिरी   ५ कोटी
सिंधुदुर्ग  ६.६५ कोटी
नाशिक  १८१.५० कोटी
धुळे  ७४.८७ कोटी
नंदूरबार  १.१३ कोटी
जळगाव   १७९.९८ कोटी
नगर  १३५.५५ कोटी
पुणे  ३९.५५ कोटी
सोलापूर  ५८.१५ कोटी
सातारा १७.५७ कोटी
सांगली ३४.४८ कोटी
कोल्हापूर  ३८ लाख
औरंगाबाद  १२१.८१ कोटी
जालना ११० .२१ कोटी
बीड  १४४.१८ कोटी
लातूर १००.६८ कोटी
उस्मानाबाद  ७८.१९ कोटी
नांदेड  १२३.१४ कोटी
परभणी  ८७.६२ कोटी
हिंगोली  ५३.७६ कोटी
बुलडाणा १३६.१३ कोटी
अकोला ७२.५५ कोटी
वाशीम ५६.५१ कोटी
अमरावती    ७२.४० कोटी
यवतमाळ    १०१.९६ कोटी
वर्धा  ४० लाख
नागपूर  १३.३६ कोटी
भंडारा    २.८७ कोटी
गोंदिया   २.६६ कोटी
चंद्रपूर १९.४५ कोटी
गडचिरोली ३.४० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com