agriculture news in Marathi two thousand crore reimbursement for crop loss affected farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी शासनाकडून वितरीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍यांमधील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने दोन हजार ५९ कोटी वितरित केले आहेत. सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच ‘‘संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करावी तसेच या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नये,’’ असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍यांमधील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने दोन हजार ५९ कोटी वितरित केले आहेत. सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच ‘‘संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करावी तसेच या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नये,’’ असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

राज्यात ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये क्‍यार व ‘महा’चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबरला मुंबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार शेतीपिकांसाठी प्रति हेक्‍टरी ८ हजार व बहूवार्षिक फळबागांसाठी प्रति हेक्‍टरी १८ हजार दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

याबाबत शासनाने १८ नोव्हेंबरला शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार नुकसान झालेल्या ३४ जिल्ह्यांसाठी २०५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रचलित नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिकच्या नुकसानीला मदत दिली जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करावी. या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

जिल्हा निहाय मंजूर मदत (कोटींत)

ठाणे  ८.२० कोटी
पालघर  ९.७३ कोटी
रायगड  ५.१७ कोटी
रत्नागिरी   ५ कोटी
सिंधुदुर्ग  ६.६५ कोटी
नाशिक  १८१.५० कोटी
धुळे  ७४.८७ कोटी
नंदूरबार  १.१३ कोटी
जळगाव   १७९.९८ कोटी
नगर  १३५.५५ कोटी
पुणे  ३९.५५ कोटी
सोलापूर  ५८.१५ कोटी
सातारा १७.५७ कोटी
सांगली ३४.४८ कोटी
कोल्हापूर  ३८ लाख
औरंगाबाद  १२१.८१ कोटी
जालना ११० .२१ कोटी
बीड  १४४.१८ कोटी
लातूर १००.६८ कोटी
उस्मानाबाद  ७८.१९ कोटी
नांदेड  १२३.१४ कोटी
परभणी  ८७.६२ कोटी
हिंगोली  ५३.७६ कोटी
बुलडाणा १३६.१३ कोटी
अकोला ७२.५५ कोटी
वाशीम ५६.५१ कोटी
अमरावती    ७२.४० कोटी
यवतमाळ    १०१.९६ कोटी
वर्धा  ४० लाख
नागपूर  १३.३६ कोटी
भंडारा    २.८७ कोटी
गोंदिया   २.६६ कोटी
चंद्रपूर १९.४५ कोटी
गडचिरोली ३.४० कोटी

  


इतर अॅग्रो विशेष
नागपूरात १०.६ अंश तापमान पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...