Agriculture news in marathi Two thousand farmers wait for electricity connection in Parbhani district | Agrowon

परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना वीजजोडणीची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६५३ शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरली आहे. त्यापैकी आजवर ५१२ शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. अद्याप २ हजार १४१ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा सिंचन स्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, वीज जोडणीअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६५३ शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरली आहे. त्यापैकी आजवर ५१२ शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. अद्याप २ हजार १४१ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा सिंचन स्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, वीज जोडणीअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासोबतच विहिरी, कूपनलिका, शेततळे, कालवा आदी सिंचन स्रोतांतून पाण्याचा उपसा व्हावा, कृषिपंपाना दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्यात कृषिपंप योजना राबविली जात आहे. त्या अंतर्गत पारंपरिक पद्धतीने वीजजोडणी नसलेल्या, महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर गरजू शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

जिल्ह्यातील सर्वसाधरण वर्गवारीतील शेतकऱ्यांनी ८ हजार ७६५ अर्ज, अनुसूचित जाती वर्गवारीतील शेतकऱ्यांनी ५४० अर्ज, अनुसूचित जमाती वर्गवारीतील शेतकऱ्यांनी ११६ अर्ज असे एकूण ९ हजार ४२१ अर्ज आले. त्यापैकी सर्व वर्गवारीतील मिळून एकूण ३ हजार ५७० अर्ज बाद झाले. एकूण ५ हजार २६२ शेतकऱ्यांना मंजुरी देऊन कोटेशन देण्यात आले. त्यापैकी सर्वसाधारण वर्गवारीतील २ हजार ४२७, अनुसूचित जातीच्या १८२, अनुसूचित जमातीच्या ४४ असे एकूण २ हजार ६५३ शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरली. त्यापैकी १ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या शेतावर सौर कृषिपंप बसविण्यासाठी संबंधित विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली.

विहिरी, बोअरना यंदा मुबलक पाणी आहे. परंतु, वीजजोडणी नाही. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. सौर कृषिपंप बसविण्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तत्काळ वीजजोडण्या देण्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी अनामत भरून जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...