Agriculture news in Marathi Two thousand licenses in the district for transporting goods | Agrowon

शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन हजार परवाने

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाच्या पुढाकाराने परिवहन विभागाने नगर जिल्ह्यामधील दोन हजार शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे वाहतुकीसाठी वाहनांना परवाने दिले आहे. अजून किमान दहा दिवस बंद राहणार असल्याने परवाने देण्याचे काम सुरूच आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाच्या पुढाकाराने परिवहन विभागाने नगर जिल्ह्यामधील दोन हजार शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे वाहतुकीसाठी वाहनांना परवाने दिले आहे. अजून किमान दहा दिवस बंद राहणार असल्याने परवाने देण्याचे काम सुरूच आहे, असे कृषी विभागाने सांगितले.

 ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन केल्यानंतर आठवडी बाजार, बाजार समित्या बंद झाल्याने सर्वाधिक अडचण शेतकऱ्यांची भाजीपाला, फळे विक्रीची अडचण निर्माण झाली. सुरुवातीचे तीन दिवस बंद असल्याने वाहतूक करता आली नसल्याने नुकसानही झाली. मात्र, बंदच्या काळात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे, दूध व अन्य अत्यावश्यक सेवेतील वस्तू खरेदी-विक्री करता यावी यासाठी शेतकऱ्यांच्या  वाहनांना परवाने देणयाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनील गवळी यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन नियंत्रण कक्ष केला. 

त्यामुळे आतापर्यंत नगर विभागातून दीड हजार तर श्रीरामपूर विभागातून पाचशेपेक्षा अधिक वाहनांना वाहतूक परवाने दिली असल्याची माहिती आत्माचे समन्वयक श्रीकांत जावळे यांनी सांगितले. वाहन परवाने मिळाल्याने शेतकऱ्यांना थेट भाजीपाला, फळे विक्री करण्याला सोपे झाले आहे. बंद असे पर्यंत परवाने देण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

फळे, भाजी विक्रेते वाढले
लाॅकडाऊनच्या काळात लोक घरी आहेत. या काळात घराबाहेर पडले तर पोलिस कारवाई करत आहेत. मात्र, भाजीपाला, फळांची विक्री करण्याला परवानगी आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत नगर शहरासह जिल्ह्यामधील मोठ्या प्रमुख शहरात भाजीविक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जागोजागी बसलेल्यांसह काॅलनी, अपारमेंटमध्ये भाजीपाला, फळे विक्री करणारे वारंवार दिसत आहेत. याशिवाय रस्त्यावर वाहनावंर भाजीपाला, विक्री अत्यावश्यक सेवा यासह पत्रकार, रुग्णालयातील कर्मचारी, दूध विक्रेता असे स्टिकर लावलेली वाहनेही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अशा वाहनांचीही तपासणी केली जात आहे. बोगस आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...