Agriculture news in Marathi Two thousand quintals of cotton lying unsold in Sangli | Page 2 ||| Agrowon

सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस विक्रीविना पडून

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक राज्यात मुधोळ, बैलहोंगल, विजापूर, गोकाक याठिकाणी बाजारपेठ विक्री होते. परंतु कोरोना विषाणूमुळे राज्याच्या सीमा बंद आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परवानगी शिवाय कापूस याठिकाणी विक्री करता येत नसल्याने दोन हजार क्विंटल कापूस विक्रीविना पडून आहे.

सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक राज्यात मुधोळ, बैलहोंगल, विजापूर, गोकाक याठिकाणी बाजारपेठ विक्री होते. परंतु कोरोना विषाणूमुळे राज्याच्या सीमा बंद आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परवानगी शिवाय कापूस याठिकाणी विक्री करता येत नसल्याने दोन हजार क्विंटल कापूस विक्रीविना पडून आहे. एकतर सांगली जिल्ह्यात बाजारपेठ किंवा कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. अन्यथा कर्नाटकात विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी खटाव येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

मिरज पूर्व भागातील खटाव परिसरात अनेक वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेत असतात यामुळे सांगली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घेणारे खटाव हे एकमेव गाव आहे. गावातील कापूस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील विजापूर, गोकाक, बैलहोंगल इत्यादी ठिकाणाच्या बाजारपेठेत विक्री साठी पाठविले जाते. काही वेळा तेथील व्यापारी जागेवर येऊन कापूस खरेदी करून नेत असतात. परंतु लॉंकडाऊनमुळे यावेळी गावामध्ये सुमारे दोन हजार क्विंटल पेक्षा जास्त उत्पादिक झालेला कापूस विक्री विना पडून आहे.

शेतकऱ्यांनी दर वाढेल उद्देशाने ठेवलेला कापूस कोरोनाच्या महामारीत अडकला आहे. राज्यात जवळ कुठेही कापूस विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने कापसाची खरेदी करण्यास राज्यात परवानगी द्यावी, किंवा सांगलीत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

दरवर्षी १०० क्विंटल कापसाचे उत्पादन घेतो.लॉकडाऊनमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान होत आहे. वर्षभर काबाड कष्ट करुन पिकविलेला कापूस विक्री करता येत नाही. यावर्षी कर्नाटकातील व्यापाऱ्यांना खरेदी करण्यास परवानगी देऊन होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
- सोमलिंग पुजारी, शेतकरी

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी ऑनलाईन कापूस विक्रीबाबत मगणी केल्यास विक्रीची व्यवस्था करता येईल.
- दिनकर पाटील,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...