Agriculture news in Marathi Two thousand Rohitras closed in Shirur | Agrowon

शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक थ्रीफेज रोहित्राचा वीजपुरवठा गुरुवार (ता. १८)पासून बंद केला आहे. सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ही धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक थ्रीफेज रोहित्राचा वीजपुरवठा गुरुवार (ता. १८)पासून बंद केला आहे. सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ही धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

महावितरणच्या या कारवाईचा शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, सादलगाव, आलेगाव पागा, आंधळगाव, तांदळी, बाभूळसर, इनामगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कारण भीमा, मुळा-मुठा नदी पात्रात पाणी असूनही विजेअभावी ते देता येत नसल्यामुळे पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

दर तीन महिन्याला शेतकऱ्यांना वेठीस धरून वीजबिल वसुलीसाठी ट्रान्स्फार्मरचा वीजपुरवठा बंद केला जात आहे. वास्तविक वीज कंपनी आठ तास वीजपुरवठा करत असताना २४ तासांचे अंदाजे वीजबिल देत आहे. सद्यःस्थितीत कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल आहेत. वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. याबाबत वडगाव रासाईचे शेतकरी सुभाष ढवळे म्हणाले की, कंपनीच्या वीजबिलामध्ये आकारणी करताना ताळमेळ असायला हवा. मागील तीन महिन्यांपूर्वी दहा एचपीचे भरलेले बिल या वेळेस वीस एचपीचे आकारण्यात आले आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू न केल्यास महावितरण विरोधात शेतकरी मोठे आंदोलन करतील.

रांजणगाव सांडसचे संभाजी रणदिवे म्हणाले की, महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नियोजन कोलमडले आहे. वीज तोडणीबाबत रांजणगाव सांडसचे संतोष लोखंडे यांनीही संताप व्यक्त केला.

वीजबिल भरून सहकार्य करावे : अभियंता टेंगले
न्हावरे (ता. शिरूर) येथील सहायक अभियंता बाळासाहेब टेंगले म्हणाले, की कृषी संजीवनी योजनेनुसार थकबाकीदारांना दिलेले हप्ते व चालू बिलाची रक्कम भरल्यानंतर तत्काळ वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. ज्यांचे अधिकृत वीज कनेक्शन नाही त्यांनी त्वरित अर्ज करावा. कंपनी नियमानुसार त्यांना त्वरित वीजपुरवठा देण्यात येईल. शिरूर उपविभागात ३०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून कार्यवाही करण्यात येत आहे. वीजबिलाचा भरणा करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
 


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...