agriculture news in Marathi, two time auction of turmeric in Sangali, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकेत वाढ होते. यामुळे दिवसातून दोन वेळा सौदे केले जातात. मेअखेर दिवसातून दोन वेळा सौदे सुरू राहतील. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार हळदीची विक्री केली आहे. 
- दिनकर पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली.

सांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून हळदीची आवक वाढली असून दिवसातून दोन वेळा सौद्यास प्रारंभ झाला आहे. हळदीची सध्या दररोज सकाळच्या टप्प्यात १२ ते १५ हजार क्विंटल तर दुपारच्या टप्प्यात चार ते पाच हजार क्विंटल आवक होत आहे. हळदीला सध्या ८,१०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. 

महाराष्ट्रातील हळदीची अग्रगण्य बाजारपेठ म्हणून सांगली बाजार समितीची ओळख आहे. सांगली बाजार समिती हळदीसाठी महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे बाजारपेठेत सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, जळगाव या जिल्ह्यांबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यातूनही हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सांगली बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्‍वास असल्यामुळे दिवसेंदिवस व्यवहार वाढतच आहेत.

यंदा राज्यात हळदीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ असली तरी कमी पाऊस आणि पाण्यच्या कमतरतेमुळे मराठावाडा आणि विदर्भात हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी उत्पादन स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या दरात तेजी होण्याची शक्यता फार कमी असल्याचेही सांगितले आहे. हळदीचे दर यंदा गतवर्षी सरासरी ८ हजार ते ९ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. यंदा हळदीचे असेच दर राहतील असा अंदाज व्यापारी आणि बाजार समितीने व्यक्त केला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...