agriculture news in marathi, two women to get stuck in flood, sangli, maharashtra | Page 2 ||| Agrowon

महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन रात्री काढल्या गावातच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता. वाळवा) येथील येसाबाई आकाराम कदम (वय ७०) व लिलाबाई पाटील (वय ४५) या दोन महिलांनी उरात धडकी भरविणारा महापूर आलेला असतानाही तीन रात्री गावातच काढल्या. त्यांच्या या धाडसाला सलामच करावा लागेल.

नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता. वाळवा) येथील येसाबाई आकाराम कदम (वय ७०) व लिलाबाई पाटील (वय ४५) या दोन महिलांनी उरात धडकी भरविणारा महापूर आलेला असतानाही तीन रात्री गावातच काढल्या. त्यांच्या या धाडसाला सलामच करावा लागेल.

येसाबाई आकाराम कदम या मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील सोमवारी व मंगळवारी महापुराची तीव्रता वाढली. झपाट्याने वाढलेल्या पाणीपातळीमुळे गावाबाहेर पडण्याचे मार्ग बंद होणार होते. लोकांनी जनावरे काही समान बाहेर काढत गाव सोडले. येसाबाई आपल्या मुलाच्या मदतीने बाहेर पडणार होत्या. परंतु त्यांचा मुलगा मळी भागात शेतमजुरीसाठी गेला होता. तो तिकडेच अडकून पडला होता. तोपर्यंत रात्र झाली. वीस ते पंचवीस लोक वगळता गावात कोणीच राहिले नाही. त्यामुळे येसाबाई यांनाही घराबाहेर पडता आले नाही. त्या अपंग असल्याने त्यांना चालत जाणे शक्‍य नव्हते. परंतु, या स्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही. आपल्या साध्या विटामातीच्या घराला कुलूप लावले आणि त्या घराबाहेर पडल्या आणि घरासमोर बांधकाम सुरू असणाऱ्या घराचा आडोसा त्यांनी घेतला. तोपर्यंत त्यांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी आले होते. त्यांनी धीर न सोडता काळोख, विषारी साप, विंचू याची पर्वा न करता महापुराच्या त्या रात्री गावातच राहिल्या.

येसाबाई यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या लिलाबाई यांचे पती आजारी असल्याने त्यांनाही घराबाहेर पडता आले नाही. त्यांनीही कोरड्या जागेत आसरा घेत प्रचंड महापुरात गावातच राहणे पसंत केले. गावात थांबलेल्या युवकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांना बाहेर काढून धोका पत्करण्यापेक्षा आहे त्या ठिकाणीच जेवण पोच करून त्यांना आधार दिला. महापूर ओसरल्यावर येसाबाई यांनी घरात प्रवेश केला. मात्र विटा मातीच्या घराच्या भिंती कधीही पडतील अशी स्थिती निर्माण झाली असून त्याच घरात त्या राहतात. त्यांच्या घरकुलचा प्रस्ताव शासन दप्तरी धूळ खात पडला आहे.

‘मला मदत मिळाली, दुसऱ्यांनाही द्या’
येसाबाई या मजुरी करतात. पूर ओसरल्यावर गावात धान्य व इतर साहित्यांची मदत येणे सुरू आहे. घरात पाणी न गेलेले ही मदत हातोहात लुटत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात हे वाटप सुरू असताना येसाबाईंना त्यांची मदत मिळाली होती. तरीही एका संयोजकाने त्यांना मदत घ्या असे सांगितले. मला मदत मिळाली आहे, बाबा, दुसऱ्यांना द्या, असे सांगत त्यांनी गरीब परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा इतरांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीप्रश्नी `रयत क्रांती`चे पंढरपुरात...सोलापूर  ः रयत क्रांती संघटनेच्या...
महिनाअखेरपर्यंत पीककर्ज उद्दिष्टपूर्ती...वर्धा  : शेतकऱ्यांना बियाणे, खते व...
आघाडीच्या वादात शरद पवारांची मध्यस्थीमुंबई : मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत...
डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देणार ः...मुंबई  : हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची...
साताऱ्यातील धरणांमध्ये समाधानकारक...सातारा: सध्या जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली...
मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारच्या...पुणे  ः तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या सरकारने...
कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पाऊसकोल्हापूर: गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालन्यात मका पिकावर अमेरिकन...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत काही...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मका,...परभणी  : परभणी, हिंगोली, नांदेड...
पुणे जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर ...पुणे  ः गेल्या काही दिवसांपासून मक्यावर...
नगरमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी...नगर  ः जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही मका...
बुलडाण्यात मक्यावर ५ ते १० टक्के...बुल़डाणा  ः जिल्ह्यात या हंगामात मक्याची...
सोलापुरात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीची...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात खरीपातील...
नाशिकमध्ये मक्यावर तीन ते चार टक्के...नाशिक : जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...