agriculture news in Marathi, two year extension to group farming, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

गटशेती योजनेला दोन वर्षे मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी अनुदान वाटपाची योजना अजून दोन वर्षे सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यामुळे शेतकरी गटांना किमान अडीचशे कोटी रुपये मिळण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात शेतजमिनीचे तुकडीकरण वेगाने होत आहे. प्रत्यक्ष कसण्यालायक क्षेत्रात होणारी घट आणि शेतीमधील खर्च अफाटपणे वाढत असल्यामुळे भविष्यात केवळ गटशेतीचा पर्याय हाती असेल, असे शासनाला वाटते. इस्त्राईलमधील शेती हे गटशेतीचे एक उत्तम मॉडेल डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी योजनांची बांधणीदेखील शेतकरी गटांना केंद्रस्थानी ठेवून केली जात आहे.  

पुणे : राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी अनुदान वाटपाची योजना अजून दोन वर्षे सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यामुळे शेतकरी गटांना किमान अडीचशे कोटी रुपये मिळण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात शेतजमिनीचे तुकडीकरण वेगाने होत आहे. प्रत्यक्ष कसण्यालायक क्षेत्रात होणारी घट आणि शेतीमधील खर्च अफाटपणे वाढत असल्यामुळे भविष्यात केवळ गटशेतीचा पर्याय हाती असेल, असे शासनाला वाटते. इस्त्राईलमधील शेती हे गटशेतीचे एक उत्तम मॉडेल डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी योजनांची बांधणीदेखील शेतकरी गटांना केंद्रस्थानी ठेवून केली जात आहे.  

गटशेतीला चालना देणारी योजना २०१८ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन ते चार कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले. गटशेतीसाठी प्रकल्पाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. २० टक्के निधी बॅंकांकडून कर्जरूपाने मिळत असल्याने गटांना केवळ २० टक्के निधी जमवून योजनेत भाग घेता येतो. 

 गटशेतीमधील प्रकल्पांना कर्जासाठी बॅंकांकडून आखडता हात घेतला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांनी बॅंकांना सूचना दिल्या. त्यामुळे बॅंकांकडून प्रकल्पांना मंजुरी मिळण्यास वेग मिळाला. परिणामी, शेतकरी गटांना दुसऱ्या वर्षी ७४ कोटींच्या पुढे अनुदान मिळाले. राज्यातील किमान २०० गटांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

अशी आहे गटशेती योजना

  •   इस्त्राईलमधील मॉडेलच्या धर्तीवर गटशेती योजनेला प्रारंभ 
  •   २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात तीन ते चार कोटी रुपयांचे अनुदान वाटप
  •   गटशेतीसाठी प्रकल्पाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते
  •   दुसऱ्या वर्षी ७४ कोटींच्या पुढे अनुदान वाटप
  •   राज्यातील जवळपास २०० गटांना योजनेचा लाभ

    २५० कोटी वाटपाची शक्यता
    अनुदान वाटप आता २०२१ पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता मिळाल्यामुळे तिसऱ्या वर्षी किमान १५० कोटींचे वाटप होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. चौथ्या वर्षापर्यंत किमान २५० कोटी रुपये या योजनेतून गटशेतीला मिळू शकतात. 

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...