agriculture news in Marathi two years extension for chief minister drinking water scheme Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आल्याने यातील प्रगतिपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आता या योजनेस दोन वर्षे (२०२१-२२) मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ८) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आल्याने यातील प्रगतिपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आता या योजनेस दोन वर्षे (२०२१-२२) मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ८) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यात २०१६-१७ व २०१९-२० ते या कालावधीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला होता. या कार्यक्रमांतर्गत २००० कोटी इतका निधी १००३ नवीन पाणीपुरवठा योजना, १३०.८६ कोटी इतका निधी बंद असलेल्या ८३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी व ४०० कोटी इतका निधी देखभाल दुरुस्ती प्रोत्साहन अनुदानासाठी अशाप्रकारे एकूण २५३० कोटी इतका निधी चार वर्षांच्या कालावधीत राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित होते.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ६०० कोटी इतक्या किमतीच्या ७४३ नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ११८.६३ कोटी इतक्या किमतीच्या ३२ बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अशा सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर असून उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता ४३० कोटी इतक्या निधीची आवश्यकता 
होती.

३१ मार्चला संपला कालावधी
पण मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या प्रगतिपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेस दोन वर्षे (२०२१-२२ पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...