agriculture news in marathi two young friends from nashik district becomes geranium oil entrepreneurs | Agrowon

दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजक

मुकुंद पिंगळे
शनिवार, 16 जानेवारी 2021

नाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व स्वप्नील नवगिरे या तरुणांनी जिरॅनिअम पिकापासून सुगंधी तेलनिर्मिती यशस्वी करून तरुण वयातच उद्योजकतेचा आदर्श उभारला आहे. ओझर मिग (ता. निफाड) येथे त्यांनी ‘मोबाईल प्रक्रिया युनिट’ उभारले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व स्वप्नील नवगिरे या तरुणांनी जिरॅनिअम पिकापासून सुगंधी तेलनिर्मिती यशस्वी करून तरुण वयातच उद्योजकतेचा आदर्श उभारला आहे. ओझर मिग (ता. निफाड) येथे त्यांनी ‘मोबाईल प्रक्रिया युनिट’ उभारले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्‍वर (ता. निफाड) येथील सौरभ जाधव हा कृषी पदवीधर आहे. अभ्यासूवृत्ती व नवनिर्मितीकडे कल असलेल्या सौरभने शोधकवृत्तीतून जिरॅनिअम पिकापासून सुगंधी तेलनिर्मिती करण्याचे नक्की केले. त्यापूर्वी लागवड, काढणीपश्‍चात प्रक्रिया, तेलनिर्मिती, बाजारपेठ आदी बारकावे समजून घेतले. घरच्यांचा सुरुवातीला विरोध असताना स्वतःकडील बचत रक्कम व मित्रांकडून उसनवारी करून ७० हजार रुपयांचे भांडवल उभे केले. वनस्पतीच्या काड्या आणून रोपनिर्मितीचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयोग फसला. मग नारायणगाव (जि. पुणे) येथून तयार रोपे आणून ओझर येथे घेतलेल्या अर्धा एकर भाडेतत्त्वावरील क्षेत्रात जानेवारी २०१८ मध्ये ४ हजार रोपांची लागवड केली. रोपांच्या निर्मितीत काही अंशी अपयश आले. मात्र त्रुटी शोधून काढल्या. सातत्यपूर्ण अभ्यास, सूक्ष्म निरीक्षणे यातून समस्यांवर मात केली.

तेलनिर्मितीसाठी स्थलांतरित मॉडेल
तेलनिर्मितीसाठी आवश्‍यक २०० किलो पाला प्रक्रिया क्षमतेचे युनिट ज्ञान व स्वकुशलबुद्धीतून विकसित केले. तेलाचा अधिक उतारा व गुणवत्ता कशी मिळेल यासाठी सातत्यपूर्ण काम करून निरीक्षणे नोंदवली. प्रक्रिया यशस्वी होताच क्षमता वाढविण्यासाठी मित्र स्वप्नील नवगिरे यास सोबत घेऊन ‘डिझाइन’ बनविले. पुढे एकत्र काम करत पावणेदोन लाख रुपये भांडवलात ५०० किलो पाला प्रक्रिया क्षमतेचे युनिट बनविले. लागवडीखालील क्षेत्र तीन ठिकाणी असल्याने पाला काढणीयोग्य झाल्यानंतर स्थलांतरित (मोबाईल) स्वरूपाचे हे युनिट आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाचविण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो.

...असा आहे तेलनिर्मिती प्रकल्प

 • ‘परिमल जिरॅनिअम फार्म्स ॲण्ड प्रोसेसिंग’ नावाने उद्योग

करार शेती

 • ओझर येथे जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन २०१८ मध्ये लागवड. टप्प्याटप्प्याने विस्तार करून करार शेती. सध्या एकूण क्षेत्र साडेदहा एकर. पैकी ओझर- ६, देवगाव व सिन्नर तालुक्यांतील सोमठाणे येथे ३.५ एकर.
 • संबंधित चार शेतकऱ्यांना ७ रुपये प्रति नगाप्रमाणे रोपपुरवठा.
 • तयार पाल्याची प्रतिटन ३ ते ५ हजार रुपये दराने खरेदी
 • लागवड, पीक व्यवस्थापन सौरभ तर प्रक्रिया व व्यवस्थापन स्वप्नील पाहतात.

तेलनिर्मिती

 • जिरॅनिअमचे सर्व भाग (खोड, पाने, फुले) तेलनिर्मितीत उपयोगात येतात.
 • कापणी झाल्यानंतर २४ तासांच्या आत प्रक्रिया.
 • उर्ध्वपातन युनिटमध्ये होते प्रक्रिया. डिस्टिलेशन युनिट, बॉयलर, व्हेसल.
 • ऑइल सेपरेटर उपकरणाचा वापर करून तेल पाणीविरहित केले जाते.
 • सुगंधी तेल ५, २ व १ लिटर वजनात बाटलीबंद होते.

तेलाला मागणी

 • सौंदर्यप्रसाधने, ‘परफ्युम’, अगरबत्ती, सुगंधी जलनिर्मिती, पानमसाला उद्योगाकडून.
 • मात्र तेलाची गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे सौरभ सांगतात.

उत्पादन

वर्ष तेलनिर्मिती (लिटर) रोपेनिर्मिती (लाख)
२०१८ १.५०
२०१९ २२
२०२० १४

अर्थकारण

 • हे पीक तीन वर्षे चालते. प्रत्येक वर्षाला तीन वेळा पाला कापणी. प्रत्येक कापणीसाठी ५ हजार रुपये असा वर्षातून १५ हजार रुपये खर्च.
 • तीन कापण्यांमध्ये ३५ ते ४० टन पाला. प्रति टन पाल्यापासून एक किलो सुगंधी तेल मिळते.
 • सरासरी दर किलोला १२ हजार ते साडेबारा हजार रुपये.
 • सध्या मुंबई येथील मोठ्या व्यापाऱ्याला व पुणे येथील उद्योजक मित्राला पुरवठा.

उत्पन्नाचे अन्य मार्ग
आंतरपिकांत उत्पन्न

फक्त मुख्य पीक लागवडीवर अवलंबून न राहता कोथिंबीर, शेवगा, डाळिंब, टरबूज आदी पिके त्यात घेतली आहेत. रासायनिक निविष्ठांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर असतो. जिरॅनिअम वनस्पतीतील गुणधर्मामुळे कीड- रोगप्रतिबंध झाल्याचे सौरभ सांगतात. आंतरपिकांतील उत्पन्नातून भाडेशुल्क कमी होते.

रोपनिर्मिती

 • रोपे खरेदी करून लागवड ही खर्चिक बाब होती. यावर मात करण्यासाठी रोपेनिर्मितीचे तंत्र समजून घेतले.
 • योग्य काडी निवड करून कोकोपीट माध्यमात सुमारे ५० दिवसांत रोपे तयार होतात.
 • तीन वर्षांत ११.५० लाख रोपे तयार केली. प्रति रोपनिर्मितीसाठी ४ रुपये खर्च. विक्री ७ रुपयांप्रमाणे
 • चालू वर्षी सहा लाख रोपनिर्मितीचे उद्दिष्ट. पैकी एक लाख विक्री.

कंपोस्ट खत
तेलनिर्मितीनंतर टाकाऊ काड्यांपासून एका टन ते ८०० किलोपर्यंत सेंद्रिय खत तयार होते. त्याचा वापर शेतातच होतो.

अडचणींवर मात

 • तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून त्रुटी दूर केल्या.
 • मर्यादित भांडवल असल्याने अनुभवातून पर्याय शोधून किमान खर्चात कामकाजाचे व्यवस्थापन
 • उद्योग विस्तार करताना टप्प्याटप्प्याने लागवड व प्रक्रिया क्षमता वाढ

स्वयंचलित युनिटसाठी प्रयत्न 

 • निफाड, सिन्नर व दिंडोरी तालुक्यांतील शेतकरी करार शेती शेतीसाठी इच्छुक. अनेक जण
 • या नव्या पीक पद्धतीबाबत सौरभ यांच्याकडे चौकशी करतात. काही भेट देतात. नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील प्रा. योगेश भगुरे यांचे मार्गदर्शन.
 • मात्र सध्या ५०० किलो पाला प्रक्रिया होऊ शकेल अशी युनिटची क्षमता. त्यासाठी साडेतीन लाख रुपयांचे किमान भांडवल. एक टन क्षमतेपर्यंत पोचण्याचे प्रयत्न.
 • दररोज १० टन पाला प्रक्रिया करून अधिक उतारा मिळेल यासाठी स्वयंचलित युनिटची निवड.
 • अगरबत्ती, सुगंधी जलनिर्मितीवरही काम सुरू.

संपर्क : सौरभ जाधव, ७३५०५००४१७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेती, पूरक व प्रक्रियेतून आर्थिक सक्षमतापालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील...
कापूस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध सावनेर...‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्हयात...
नगदी पिकांच्या जोडीला काकडी, टोमॅटोचे...नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे...
बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत...बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख...
शेतीमध्ये बदलली पीक पद्धतीमादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप...
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...