agriculture news in marathi two youth were attacked by leopard in Nagar District Sangamner | Page 2 ||| Agrowon

बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात लपलेल्या बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास घडली.

नगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात लपलेल्या बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास घडली.

नान्नज दुमाला परिसरातील पाटोळे, चत्तरवस्ती परिसरात बिबट्या लपल्याची माहिती समजल्याने, परिसरातील युवक व ग्रामस्थांनी त्याला हाकलण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. शोध घेताना या परिसरातील एका मक्याच्या शेतात लपलेल्या बिबट्याने खाली वाकलेल्या दोन बेसावध युवकांवर हल्ला चढवला. त्यात ऋषिकेश रावसाहेब पाटोळे ( २२) व ओंकार विलास पाटोळे (१७) या युवकांचे दंड, पाठ, तोंड आदी ठिकाणी पंजाने मारून व चावा घेऊन जखमी केले आहे. त्यांना उपचारासाठी तळेगाव दिघे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याच्या भीतीपासून ग्रामस्थांची सुटका करण्याची मागणी उपसरपंच सोमनाथ चत्तर व ग्रामस्थांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...