शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : छगन भुजबळ

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : छगन भुजबळ
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : छगन भुजबळ

नाशिक : जिल्ह्यातील भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील सायगाव, तळवाडे, महादेवनगर, भारम, खरवंडी, ममदापूर, राजापूर, नगरसुल गावांत पाहणी केली. त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. ‘‘दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटिसा देण्यात येत आहेत. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे,’’ अशी टीका भुजबळ यांनी केली.

टंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी भुजबळ यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत येवला मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येथे चर्चा केली. या वेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, मोहन शेलार, वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, सचिन कळमकर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘येवला तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. तरीही शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून सक्तीच्या कर्जवसुलीच्या नोटीस देण्यात येत आहेत. पुढील दीड-दोन महिन्यांत खरीप हंगाम सुरू होईल. तेव्हा बुडालेल्या नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे उपलब्ध होईल? गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलेच व्यवहार नसल्याने कर्ज मिळणार नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडे पैसे येणार तरी कसे?’’

‘‘अद्याप शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान मिळाले नाही. कुक्कुटपालकांकडील ७० हजारांहून अधिक पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे.’’ असेही भुजबळ यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com