agriculture news in Marathi ubhari for farmer sucide families Maharashtra | Agrowon

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देणार ‘उभारी’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाकडून उभारी उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी नाशिक विभागात १ हजार ३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

नगर ः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाकडून उभारी उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी नाशिक विभागात १ हजार ३४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नगर जिल्ह्यातील सर्वाधिक ४४९ शेतकरी कुटुंबे आहेत. या कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार जे कुटुंब सरकारी योजनेला पात्र ठरणार नाहीत त्यांना लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था व दानशुरांच्या मदतीने लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यावर त्या कुटुंबाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. अशा कुटुंबाला सरकारी आधार मिळावा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळावा आणि ती कुटुंबे आत्मनिर्भर व्हावीत यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेवरून नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यांत ‘उभारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून संबंधित कुटुंबाला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ देता येईल यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य प्रशासनातील अधिकारी व वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कुटुंबे नेमून दिली आहेत. 

दहा दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरु आहे. विभागात १ हजार तीनशे ४७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात नगरमधील सर्वाधिक ४४९ कुटुंबांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत ८९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ४४९ शेतकरी आत्महत्येमुळे मिळणाऱ्या लाभाला पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या आदेशानुसार शेतीला मदत व्हावी या अनुषंगाने सिंचन विहिरीसह पूरक व्यवसायासाठी शेळीपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दूधव्यवसाय व इतर योजनांसह कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आता सरकारी अधिकारीच प्रयत्न करत आहेत.

अपात्र कुटुंबांनाही मदत
जी कुटुंबे सरकारी योजनांसाठी नियमानुसार पात्र ठरणार नाहीत. त्यांना सामाजिक, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत घेऊन संबंधित कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संबंधित कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनातील प्रमुख ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यामुळे अशी कुटुंबे भविष्यात चांगले, स्वाभिमानाने व आत्मनिर्भरतेने जीवन जगू शकतील यासाठी काम सुरू आहे. 
- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर
 


इतर अॅग्रो विशेष
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...