उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार : हसन मुश्रीफ

आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली.
Uchangi will satisfy 100% of project victims: Hasan Mushrif
Uchangi will satisfy 100% of project victims: Hasan Mushrif

   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली.       प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. कॉम्रेड अशोक जाधव व कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या. कायद्याच्या चौकटीत राहूनच पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी. पुनर्वसनापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळावा. प्रकल्पग्रस्तांना जमीन तातडीने द्यावी. प्रकल्पाला गेलेल्या जमिनीच्या बदल्यात सुपीक जमीन मिळावी. अशा मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या.            मंत्री मुश्रीफ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच, शुक्रवारी (ता. १०) प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन त्याचा परिपूर्ण अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या. पंधरवड्यात या प्रश्नी पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.          बैठकीला आमदार राजेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे पंचायत समितीचे सभापती उदय पवार, सुधीर देसाई, अनिकेत कवळेकर, राजू होलम, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, सुरेश पाटील, धनाजी दळवी, प्रकाश मणकेकर, पांडुरंग धनुकटेकर या यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com